India-Bangladesh Relation : असा कुठला मासा, त्याच्या सुरक्षेसाठी बांग्लादेशने समुद्रात उतरवल्या 17 युद्धनौका, गस्ती हेलिकॉप्टर्स
India-Bangladesh Relation : बांग्लादेशने एका माशाच्या संरक्षणासाठी युद्धनौका अणि गस्ती हॅलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. बांग्लादेशी नौदलाच समुद्रातील गस्ती अभियान भारतासाठी टेन्शन वाढवू शकतं. या निर्णयामुळे भारत-बांग्लादेशचे संबंध काही प्रमाणात ताणले जाऊ शकतात.

बांग्लादेशने आपल्या समुद्री क्षेत्रात वॉरशिप आणि गस्त घालणारे हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. हिल्सा माशाच्या संरक्षणासाठी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने हा निर्णय घेतला आहे. हिल्सा हा बहुमूल्य प्रजातीचा मासा आहे. सध्या हिल्सा माशाचा प्रजनन काळ आहे. या काळात मच्छीमारांनी बेकायदरित्या जाळं टाकून हा मासा पकडू नये, यासाठी युनूस सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी या काळात हिल्सा मासा अंडी घालण्यासाठी बंगालच्या खाडीतून नद्यांमध्ये येतो. हेरिंग सारखा दिसणारा हिल्सा बांग्लादेशचा राष्ट्रीय मासा आहे. भारतात पश्चिम बंगालच्या लोकांचा हा आवडीचा मासा आहे.
यूरेशियन टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बांग्लादेश आर्मीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हिल्साच्या प्रजनन क्षेत्राच्या सुरक्षेसाठी 4 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान तीन आठवड्यांसाठी मासेमारीवर बंदी घातली आहे. हिल्सा माशाच्या सुरक्षेसाठी नौदालाने 17 युद्धनौका अणि गस्ती हॅलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. बांग्लादेशी नौदलाच समुद्रातील गस्ती अभियान भारतासाठी टेन्शन वाढवू शकतं.
या माशाची किंमत किती?
बांग्लादेशातील कोट्यवधी लोक हिल्सा माशावर अवलंबून आहेत. या माशाची किंमत ढाका येथे 2200 टक्के म्हणजे 18.40 अमेरिकी डॉलर प्रति किलोग्रॅम आहे. सैन्याच्या स्टेटमेंटनुसार युद्धनौका आणि समुद्री गस्ती हेलिकॉप्टर्स मच्छीमारांची घुसखोरी रोखण्यासाठी 24 तास लक्ष ठेऊन आहेत.
हा निर्णय का घेतला?
भारतीच मच्छीमारा गंगा नदी आणि त्याच्या विशाल डेल्टाच्या खाऱ्या पाण्यात मासे पकडतात. त्याने कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या 10 कोटी लोकांची डिमांड पूर्ण होते.
हिल्सा माशाला जितकी मागणी आहे, त्यानुसार प्रजननाच्या आधी हा मासा पकडला, तर हळू-हळू त्यांच्या राष्ट्रीय माशाच अस्तित्व संकटात येऊ शकतं, ही बांग्लादेशला चिंता आहे.
म्हणून बांग्लादेशी नेत्यांची भारतावर आगपाखड
भारत आणि बांग्लादेशमध्ये हिल्सा कूटनिती खूप प्रसिद्ध राहिली आहे. ढाकामध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे प्रमुख बनले. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. बांग्लादेशने यावर्षी दुर्गा पूजेदरम्यान भारताला 1200 टन हिल्सा मासा निर्यात करण्याची परवानगी दिलेली. बांग्लादेशात शेख हसीना सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला म्हणून बांग्लादेशी नेते भारतावर आगपाखड करत असतात.
