डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का! चीनने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 9 नोव्हेंबरपासून…
India China Flight: भारत आणि चीनमधील संबंध आता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांचे नेते एकमेकांना भेटत आहेत. तसेच आता भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे भारताला एक मोठा फायदा झाला आहे. भारत आणि चीनमधील संबंध आता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांचे नेते एकमेकांना भेटत आहेत. तसेच आता भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे. चायना ईस्टर्न एअरलाइन्सने 9 नोव्हेंबरपासून शांघाय आणि नवी दिल्ली दरम्यान राउंड-ट्रिप विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनमधील जवळीक वाढल्याची ही लक्षणे आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.
शांघाय आणि नवी दिल्ली विमानसेवा सुरू होणार
ऑगस्टमध्ये चीनमधील तियानजिन येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. यावेळी अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर आता दोन्ही देशांनी पाच वर्षांनंतर काही शहरांमधील थेट फ्लाइट्स पुन्हा सुरू होणार आहे. शांघाय आणि नवी दिल्ली दरम्यान बुधवार, शनिवार आणि रविवारी विमानसेवा सुरु होणार आहे. शांघायच्या पुडोंग विमानतळावरून हे विमान दुपारी 12:50 वाजता निघेल आणि दिल्लीत सायंकाळी 5:45 वाजता पोहोचणार आहे.
इंडिगो कोलकाता ग्वांगझूदरम्यान विमानसेवा चालवणार
परतीची फ्लाइट दिल्लीहून संध्याकाळी 7:55 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:10 वाजता शांघाय पुडोंग येथे पोहोणार आहे. चायना ईस्टर्न एअरलाइनने या विमान प्रवासासाठी तिकिटे विकण्यासही सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून इंडिगोने 26 ऑक्टोबरपासून कोलकाता ते चीनमधील ग्वांगझू साठी दररोज विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता इंडिगो एअरलाइन दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान सेवा सुरु करण्याची शक्यता वर्तवली उड्डाणे सुरू करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही देशांना फायदा होणार
शांघाय आणि दिल्ली हा हवाई मार्ग चीन आणि भारत यांच्यातील महत्त्वाच्या हवाई मार्गांपैकी एक आहे. चायना ईस्टर्न एअरलाइन्सने या मार्गावर पुन्हा विमानसेवा सुरु केल्याने चीन-भारत सेवा पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील प्रवाशांना फायदा होणार आहे.
