US Tariff: भारत अमेरिकेला घेरणार, ‘या’ देशासोबतच्या द्विपक्षीय व्यापाराबाबत मोठी घोषणा

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार आता घटला आहे. अशातच आता भारत आपल्या मालासाठी नवीन खरेदीदार शोधत आहे. भारत आता आगामी काळात एका युरोपियन देशासोबत व्यापार वाढवणार आहे.

US Tariff: भारत अमेरिकेला घेरणार, या देशासोबतच्या द्विपक्षीय व्यापाराबाबत मोठी घोषणा
jaishankar and trump
| Updated on: Sep 03, 2025 | 6:28 PM

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार आता घटला आहे. अशातच आता भारत आपल्या मालासाठी नवीन खरेदीदार शोधत आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि वडेफुल यांच्यात बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि व्यावसायिक संबंधां चर्चा झाली. यानंतर दोन्ही मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्यापाराबाबत महत्त्वाची चर्चा

दोन्ही मंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेत बोलताना एस जयशंकर म्हणाले की, आजच्या बैठकीत दोन्ही देशांमधील उद्योग सहकार्यावर चर्चा झाली. आम्ही जर्मन उद्योगांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे भारत जर्मन कंपन्यांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्यास तयार आहे. सध्या सेमीकंडक्टर हे एक प्रमुख क्षेत्र म्हणून उदयास आले आहेत. भारतातील तरुण यामध्ये आपले योगदान देऊ शकतात. तसेच यावेळी दोन्ही देशांमध्ये निर्यात निर्बंधांवरही चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील निर्यात वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका अमेरिकेला बसणार आहेत. कारण आतापर्यंत अनेरिकेला जाणारा माल आता जर्मनीला जाणार आहे.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांची इस्रोला भेट

एस जयशंकर पुढे बोलताना म्हणाले की, ‘जोहान वडेफुल यांनी इस्रोला भेट दिली. अंतराळ कार्यक्रमात आगामी काळात दोन्ही देशांना एकमेकांची मदत होऊ शकते. आम्ही ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी फायनान्स याबाबतही चर्चा केली. जर्मनीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आम्ही महाविद्यालयीन भेटींसाठी मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.’

जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यावेळी म्हणाले की, आम्ही भारत आणि युरोपियन युनियनमधील FTA (मुक्त व्यापार करार) ला पाठिंबा देत आहे. या वर्षाच्या अखेरीस हा करार होण्याची शक्यता आहे. आगामी काळात भारत AI आणि एरोस्पेस क्षेत्रात आघाडीच्या देशांमध्ये आघाडीवर असेल. यात दोन्ही देशांमधील पार्टनरशीप भविष्यात वाढेल. भारत आणि जर्मनीमधील संबंध केवळ तांत्रिक प्रगतीला चालना देणार नाही नसून ते जागतिक स्तरावर नैतिक आणि जबाबदार एआय विकासालाही हातभार लावत आहेत.