AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमालियाच्या राजधानीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, भारताकडूनही प्रतिक्रिया

आफ्रिकेतील सोमालिया (Somalia) देशात एक भयानक बॉम्बस्फोट (Bomb Attack) झाला. यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झालाय.

सोमालियाच्या राजधानीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, भारताकडूनही प्रतिक्रिया
| Updated on: Mar 06, 2021 | 10:16 PM
Share

Bomb Attack in Somalia मोगादिशू : आफ्रिकेतील सोमालिया (Somalia) देशात एक भयानक बॉम्बस्फोट (Bomb Attack) झाला. यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झालाय. याशिवाय जवळपास 30 जण जखमी झालेत. सोमालियाची राजधानी मोगादिशू शहरातील एका लोकप्रिय रेस्त्रावर (Somalia Bomb Attack) हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. सोमाली नॅशनल न्यूज एजन्सीने आमिन रुग्णवाहिका सेवा देणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यातील आतापर्यंत मृतांची संख्या 20 असल्याचं सांगितलंय. या हल्ल्यामागे एक स्थानिक कट्टरतावादी संघटना असल्याचं बोललं जातंय (Bomb Attack in Restrau of Mogadishu capital of Somalia many dead).

मोगादिशूचे पोलीस प्रवक्ते सादिक अली अदान यांनी हा हल्ला स्थानिकय अल-शबद (Al-Shabaab) या कट्टरतावादी संघटनेने केल्याची माहिती दिली. या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेचा संबंध अलकायदाशी (Al-Qaeda) आहे. अल-शबद अक्सर संघटनेने बॉम्ब हल्ला करत मोगादिशू शहराला लक्ष्य केलं. शुक्रवारी (5 मार्च) दुपारी स्फोटकांनी भरलेलं एक वाहन मोगादिशू शहरातील लुल यमनी रेस्त्रामध्ये घुसलं. त्यामुळे झालेल्या स्फोटामुळे रेस्रासह आजूबाजूची घरंही उद्ध्वस्त झाली. मागील वर्षी देखील अशाच पद्धतीने एका रेस्त्रावर हल्ला झाला होता.

विरोधी पक्षाच्या नेत्यांचं आंदोलन स्थगित

राजधानी मोगादिशूमधील हल्ल्यानंतर निवडणुकीत उशीर झाल्याने विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलनही स्थगित करण्यात आलं. सोमालिया सरकारने या हल्ल्यामागे संयुक्त अरब अमिरात (UAE) असल्याचा आरोप केला होता. सामालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ला करुन ‘परकीय शक्तीं’कडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप केलाय. सोमालियात 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होत्या. मात्र, त्या दिवशी मतदान होऊ शकलेलं नाही. निवडणूक कशी घ्यायची यावर सहमती न झाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यानंतर सोमालियात हिंसाही झाली. त्यात 5 सैनिक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले. यात सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक होती.

भारताकडूनही सामालियातील घटनाक्रमावर प्रतिक्रिया

भारताने सोमालियातील (India on Somalia Situation) निवडणुकांवरुन सुरु असलेल्या गदारोळीवर नाराजी व्यक्त करत हे निराशाजनक असल्याचं म्हटलंय. निवडणुकींसाठीचा हा उशीर अल-शबाब आणि इतर सशस्त्र संघटनांना आपली दहशतवादी कृत्ये करण्याची संधी देईल आणि आतापर्यंत लोकशाही मार्गाने मिळवलेला विकास धोक्यात येईल, असं मत भारताने व्यक्त केलं.

हेही वाचा :

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, 40 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा अधिक जखमी

VIDEO : पराभव जिव्हारी, चाहत्यांकडून स्टेडियमध्ये बॉम्ब हल्ला

व्हिडीओ पाहा :

Bomb Attack in Restrau of Mogadishu capital of Somalia many dead

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.