AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 33 व्या वर्षात 80 खून… नराधमाने कबुली देताच पोलीस हादरले, लपण्यासाठी बायकांच्या…

ब्राझीलमध्ये 33 वर्षीय जोरलान अल्वेस दा सिल्वा या संशयित सिरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने महिला वेश धारण करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने 80 खुनांची कबुली दिली. ब्राझीलच्या गुन्हेगारी इतिहासातील ही सर्वात मोठी घटना असू शकते, कारण पोलीस त्याच्या दाव्याची सत्यता पडताळत आहेत.

अवघ्या 33 व्या वर्षात 80 खून... नराधमाने कबुली देताच पोलीस हादरले, लपण्यासाठी बायकांच्या...
Brazilian serial killerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 5:51 PM
Share

एखाद्या व्यक्तीवर एक दोन नव्हे तर तब्बल 80 खूनाचा आरोप असेल आणि तो मुलगी बनून फिरत असेल तर पोलीसही चक्रावून जातात. अशा चालाख आरोपीला शोधणं सोपं नसतं. पण पोलिसांनी मोठ्या शिताफिने या नराधमाला अटक केली आहे. ब्राझिलमधील ही घटना आहे. पण हादरवणारी आहे. एका 33 वर्षाच्या संशयित सीरिअल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. तो महिलेचा वेष धारण करून पळण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या 33 वर्षाच्या आयुष्यात 80 खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र, पोलीस त्याच्या या दाव्याची पडताळणी करत आहेत.

न्यूयॉर्क पोस्टने ही बातमी दिली आहे. ब्राझिलच्या उत्तर पूर्वेकडील पैराइबा राज्यातील ही घटना आहे. पोलिसांनी 33 वर्षाच्या जोरलान अल्वेस दा सिल्वा नावाच्या व्यक्तीला पकडलं आहे. त्याने जाळीदार ड्रेस घातलेला होता. डोक्यावर लांब सडक केसांचा विग लावला होता. त्याने महिलांसारखी सँडल घातली होती. काळा चष्मा लावला होता आणि हाताच्या बोटांना नेल पॉलिश केली होती. एवढेच नव्हे तर त्याच्या जवळ दोन वर्षाचा एक मुलगाही होता. हा छोटा मुलगा त्याच्याकडे कुठून आला? त्याने कुणाचं बाळ चोरलं तर नाही ना? याचा आता पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर सर्वात आधी त्याच्या डोक्यावरची विग हटवली. त्यामुळे त्याची खरी ओळख पटली. विग खाली त्याच्या डोक्यावर छोटे केस होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

आधीही निसटला…

रिपोर्टनुसार, पोलिसांनी यापूर्वीही जोरलान आणि त्याच्या काही कथित मित्रांना अटक केली होती. पोलिसांनी एक गाडी थांबवली होती. या गाडीची तपासणी करत असताना त्याला अटक केली होती. मात्र, त्यावेळी तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा बराच शोध घेतला होता. पण तो सापडत नव्हता. शेवटी तो पोलिसांना आता महिलेच्या वेषात सापडला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी त्याने हे वेषांतर केल्याचं समोर आलं आहे.

तीन महिन्यात 15 हत्या

संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या टोळीसाठी सुपारी घेऊन हत्या करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. गेल्या तीन महिन्यात त्याने कमीत कमी 15 हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या आयुष्यात 80 लोकांना ठार मारल्याची कबुली दिली आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी पहिली हत्या केल्याचं त्याने सांगितलं. त्याने एवढा मोठा दावा केला असला तरी त्याची सत्यता पोलीस पडताळत आहेत.

डबल मर्डरने हादरले

दरम्यान, जोरलानची कसून चौकशी केली असता त्याने डबल मर्डर केल्याचीही कबुली दिली आहे. 1 ऑगस्ट रोजी रियो तिंटोमध्ये झालेल्या दोन व्यापाऱ्यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. पोलीस अधिकारी डगलस गार्सिया यांनी याबाबतची माहिती दिली. ज्या ठिकाणी कथितपणे मृतदेह दफन करण्यात आले होते, त्या ठिकाणपर्यंत जोरलान पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन गेला होता. ही माहिती महत्त्वाची असून त्या दिशेने तपास सुरू आहे, असं डगलस गार्सिया यांनी म्हटलं आहे.

जोरलानने 80 हत्या केल्याचं पोलिसांनी सिद्ध केलं तर ब्राझिलच्या गुन्हेगारीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गुन्हा असणार आहे. यापूर्वी पेड्रो रोड्रिग्सवर सर्वाधिक 71 हत्या केल्याचा आरोप होता. त्यात तो दोषी ठरला होता. रोड्रिग्सने 100 लोकांना मारल्याचा दावा केला होता. त्यामुळे जोरलानचा 80 हत्येचा दावा खरा ठरला तर ब्राझिलच्या इतिहासातील ही सर्वात धक्कादायक घटना असणार आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप