AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जेम्‍स बॉण्ड’ पटाची पटकथा प्रत्यक्षात: ब्रिटीश गुप्तचर एजन्सी MI6 प्रमुखपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती

ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याला गुप्तचर संस्था MI6 च्या प्रमुखपदी नेमले आहे. 'जेम्स बॉण्ड' पटात या संस्थेची प्रमुख महिला दाखवलेली असली तरी ब्रिटनच्या 116 वर्षांच्या इतिहासात आता प्रथमच प्रत्यक्षात एखादी महिला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेची प्रमुख झाली आहे.

'जेम्‍स बॉण्ड' पटाची पटकथा प्रत्यक्षात: ब्रिटीश गुप्तचर एजन्सी MI6 प्रमुखपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती
| Updated on: Jun 18, 2025 | 6:24 PM
Share

आपण प्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बाँडचे हॉलिवूड चित्रपट नक्कीच पाहिले असतील. या चित्रपटांमध्ये ‘मिस्टर 007’  म्हणजेच ‘जेम्स बाँड’ या एका गुप्तहेरांच्या अचाट कामगिरीने तुम्ही नक्कीच प्रभावित झाला असेल. जेम्स बॉण्ड हा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेकडून म्हणजेच MI6 कडून आदेश घेऊन काम करताना दाखवला आहे. मात्र प्रत्येक चित्रपटात जेम्स बाँडला आदेश देणारी MI6 ची संचालक एक महिला असली तरी, ब्रिटनच्या 116 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेलाच MI6 संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

47 वर्षीय ब्लेझ मेट्रेवेली यांना ही जबाबदारी दिली आहे. मेट्रेवेली या 1999 मध्ये MI6 मध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी यापूर्वी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विभागाच्या म्हणजेच ‘Q’ च्या संचालक म्हणून काम केले आहे. आता, MI6 चे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांची नवीन भूमिका ‘C’ झाली आहे.

ऑर्डर ऑफ सेंट मायकल एण्ड सेंट जॉर्ज सन्मान

मेट्रेवेली यांची पार्श्वभूमी महत्वपूर्ण आहे. त्यांनी कॅम्ब्रिज यूनिव्हर्सिटीतून मानवविज्ञानमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. मेट्रेवेली यांनी 1997 मध्ये महिला बोट रेसमध्ये सहभाग घेतला होता. मध्य पूर्व आणि यूरोपमध्ये सक्रिय क्षेत्रीय कार्यात दशकभर काम केले.त्यांनी MI5 मध्ये संचालक स्तरावर काम केले आहे.त्यांनी दहशतवाद आणि हेरगिरी यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्यांशी लढण्यासाठी मोठे योगदान दिले. 2024 मध्ये, मेट्रेवेली यांना ब्रिटिश परराष्ट्र धोरणातील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अँड सेंट जॉर्ज (CMG) सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

MI6 चे नेतृत्व सांभाळणाऱ्या मेट्रेवेली यांनी त्यांची या पदासाठी निवड झाल्याने अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “MI6, MI5 आणि GCHQ सोबत मिळून ब्रिटिश नागरिकांची सुरक्षा आणि यूकेच्या हितांना सांभाळण्याचे महत्वपूर्ण भूमिका आहे. एकीकडे रशिया,चीन, इराण आणि उत्तर कोरिया सारख्या देशांपासून जगाला धोका वाढला आहे. डिजिटल युगात जेथे बायोमेट्रिक निगराणी आणि सायबर धोक्यांची जोखीम वाढलेली आहे. याकडे पाहता MI6 ला तंत्रज्ञान आव्हानांशी तालमेल जुळवावा लागणार आहे.

ऐतिहासिक पाऊल

ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी या नियुक्तीला ऐतिहासिक म्हणत गुप्तचर सेवांचे कार्य आधी इतके महत्वपूर्ण नव्हते. मेट्रेवेली यांच्या अनुभव आणि नेतृत्व जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात ब्रिटनला मजबूत स्थितीत आणणार आहे. त्यांच्या नियुक्तीने हा संदेश देखील जात आहे की आधुनिक गुप्तचर सेवा विविधता आणि सर्वसमावेशकतेला आपलेसे करण्यासाठी तयार आहेत.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.