स्वत:चीच हत्या घडवून आणण्यासाठी ही महिला ब्रिटनमधून थेट अमेरिकेत, म्हणाली, आधी बलात्कार कर, मगच…
Sonia Exelby : अमेरिकेतील फ्लोरिडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 32 वर्षीय सोनिया एक्सेल्बी या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 32 वर्षीय सोनिया एक्सेल्बी या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुळची ब्रिटनमधील असलेली सोनिया ही एका व्यक्तीला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली होती. तिथे त्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता या प्रकरणाचा उलगडा झाला असून खरे कारण समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोनिया एक्सेल्बी ही एक डिजिटल कंटेंट क्रिएटर होती, तिचे मानसिक आरोग्य बिघडले होते. ती मरण्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडाला गेली होती. त्यानंकर काही दिवसांनी तिचा मृतदेह एक कबरीमध्ये आढळला आहे. या प्रकरणी 53 वर्षीय ड्वेन हॉल या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सोनियाशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा, तिला इजा पोहोचवण्याचा आणि तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
सोनियाचे मानसिक आरोग्य बिघडले होते
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियाने मृत्यूच्या आधी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. ज्यात ती रडत असल्याचे दिसत आहे, तसेच तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा होत्या. या व्हिडिओमध्ये सोनियाने म्हटले की, मी अमेरिकेत आली कारण मी खूप वाईट व्यक्ती आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी दुखावले आहे. या व्हिडिओमध्ये ड्वेन हॉल तिला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
ड्वेन हॉल तिला विचारतो की, तुला कसे मरायचे आहे? यावर सोनिया म्हणते की चाकूने भोकसून. हॉलने पुढे विचारले की, मरण्यासाठी तुझ्यावर कोणी जबरदस्ती करत आहे का? यावर ती म्हणाली, नाही. अटक करण्यात आलेल्या ड्वेन हॉलने असा दावा केला आहे की, सोनियाने त्याच्याकडे बलात्कार करण्याची आणि त्यानंतर चाकूने भोकसून हत्या करण्याची मागणी केली होती, सुरूवातीला त्याने नकार दिला होता. मात्र नंतर होकार दिला.
पोलीसांनी दिली माहिती
या घटनेबाबत पोलीसांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, सोनिया 10 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडामध्ये पोहोचली त्यानंतर ती 13 ऑक्टोबरला ब्रिटनला परत जाणार होती. मात्र ती ब्रिटनला न परतल्याने तिच्या कुटुंबाने तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. सोनियाला मानसिक त्रास होत होता त्यामुळे ती तिची हत्या करणाऱ्याच्या शोधात होती, यासाठी तिला प्लोरिडामध्ये ड्वेन हॉल नावाचा व्यक्ती सापडला. त्यामुळे ती स्वत:चीच हत्या घडवून आणण्यासाठी अमेरिकेला गेल्याचे समोर आले आहे.
