AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh : भारताचा मोठेपणा, नापाक इरादे बाळगणाऱ्या बांग्लादेशच्या यूनुस सरकारवर पुन्हा दाखवली दया

India-Bangladesh : सध्या बांग्लादेश पाकिस्तानच्या नादाला लागून सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही तेच दिसून आलय. भारताचा घास घेण्याचे बांग्लादेशचे इरादे आहेत. मात्र, तरीही भारताने बांग्लादेशच्या बाबतीत मनाची उदारता दाखवणारी कृती केली आहे.

India-Bangladesh : भारताचा मोठेपणा, नापाक इरादे बाळगणाऱ्या बांग्लादेशच्या यूनुस सरकारवर पुन्हा दाखवली दया
Muhammad YunusImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2025 | 1:50 PM
Share

बांग्लादेश अजून सुधरत नाहीय. सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतोय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही बांग्लादेशच तेच चाललय. सातत्याने भारताविरोधात वक्तव्य आणि खोटे आरोप बांग्लादेशकडून सुरु आहेत. प्रत्येकवेळी बांग्लादेश भारताला अडचणीत आणण्याची कुठली संधी सोडत नाही. मात्र, तरीही भारत बांग्लादेशच्या बाबतीत सतत आपल्या उदारतेचा परिचय देतोय. यावेळी सुद्धा भारताने नापाक इरादे बाळगून असलेल्या यूनुस सरकारवर दया दाखवली आहे. त्यांची दोन माणसं त्यांना परत सोपवली. बीएसएफने भारतीय क्षेत्रात ‘टिक टॉक व्हिडिओ’ बनवताना पकडलेल्या दोन बांग्लादेशींना परत त्यांच्याकडे सोपवलय. भारतीय सीमा सुरक्षा बल BSF ने आज सकाळी दोन बांग्लादेशी युवकांना परत केलं. त्यांना लालमोनिरहट पटग्राम सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं.

61 बीजीबी बटालियन धबलसुती बीओपी कॅम्पचे कमांडर नायक सूबेदार मोक्तर हुसैन यांनी मीडियाला सांगितलं की, बॉर्डर गार्ड बांग्लादेश (बीजीबी) आणि बीएसएफ दरम्यान सकाळी 3.30 वाजता फ्लॅग मीटिंग दरम्यान दोन बांग्लादेशींना परत करण्यात आलं. या युवकांना त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्यात आलं आहे.

टिक टॉक व्हिडिओ बनवत होते

BSF ने सांगितलं की, दोन्ही युवक बेकायदरित्या भारतात घुसले होते. चहाच्या मळ्यात टिक टॉक व्हिडिओ बनवत होते. एका युवकाच नाव साजेदुल इस्लाम (22) आणि दुसरा 16 वर्षांचा आहे. दोघे संध्याकाळी 6:00 वाजता गटियारविटा सीमेवरील नो-मॅन्स-लँड क्षेत्रातील सब पिलर 1-एस येथून भारतीय चहाच्या मळ्यांमध्ये घुसले होते. ते मोबाइलवर टिक टॉक व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. त्याचवेळी BSF च्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतलं.

फ्लॅग मीटिंगनंतर सोपवलं

सैन्याने ताब्यात घेताच दोन्ही युवकांना रडू कोसळलं. आपली सुटका करावी अशी त्यांनी मागणी केली. बीजीबी रंगपुर सेक्टर कमांडर आणि बीएसएफ जलपाईगुडी सेक्टर कमांडरमध्ये संपर्क झाला. बीएसएफने फ्लॅग मीटिंगनंतर दोन्ही युवकांना पुन्हा बांग्लादेशकडे सोपवलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.