US-China Fight : टॅरिफवरुन तणाव असतानाच समुद्रात भिडल्या चीन-अमेरिकेच्या सेना, US नौदलाची प्रतिष्ठा धुळीला
US-China Fight : दक्षिण चीन सागरात एक मोठा वादाचा प्रसंग घडला. चीन आणि अमेरिकेच्या नौसेना भिडल्या. या संघर्षाला काय कारण ठरलं? सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, रशिया आणि चीन या तीन देशांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या टॅरिफ वॉर छेडलं आहे. सध्या भारत या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. त्याआधी चीन होता. आता अमेरिकेने चीन सोबतची टॅरिफ सस्पेंशनची मुदत आणखी 90 दिवसांसाठी वाढवून दिलासा दिला आहे. पण अजून हा विषय निकाली निघालेला नाही. हा सर्व वाद सुरु असताना दक्षिण चीन सागरात स्कारबोरो शोल जवळ चीन आणि अमेरिकन सैन्य भिडल्याची माहिती आहे. अमेरिकन नौदलाच्या युद्धनौका अनेकदा दक्षिण चीन सागरात गस्तीवर येत असतात. त्यावरुन बऱ्याचदा वादविवाद होता. आता तर थेट भिडभिड झाली आहे. चीनच म्हणणं आहे की, या व्यस्त मार्गावरुन अमेरिकेच विध्वंसक जहाज चाललं होतं, त्याला आम्ही मारुन पळवलं. चीनने अमेरिकेवर स्कारबारो शोलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला.
फिलीपींसच्या नादात याच स्कारबारोमध्ये चीनची दोन जहाजं आपसात आपटली होती. ही घटना बरोबर त्याच्या एकदिवसानंतर झाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, चीनच्या म्हणण्यानुसार स्कारबारो शोलमध्ये अमेरिका ज्या पद्धतीने घुसखोरी करतय, ते आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे. अमेरिकेने स्कारबारोच्या माध्यमातून थेट चीनच्या संप्रभुतेला आव्हान दिलय.
चीनच म्हणणं काय?
यूएसएस हिगिंस बुधवारी परवानगीशिवाय स्कारबारो शोलमध्ये घुसलं, असं चिनी दक्षिण सैन्य कमांडने सांगितलं. त्यानंतक अमेरिकी जहाजाला इशारा देण्यात आला. अमेरिकेच हे विध्वंसक जहाज मागे फिरलं नाही. त्यानंतर यूएसएस हिगिंसला पळवण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकेने आमची संप्रुभता आणि सुरक्षेच उल्लंघन केलय असं चीनच म्हणणं आहे.
अमेरिकेने काय म्हटलं?
तेच अमेरिकेच म्हणणं आहे की, स्कारबारोमध्ये प्रवेश करताना आम्ही कायद्याच पालन केलं. अमेरिकेच्या 7 व्या आरमाराच म्हणणं आहे की, हे अभियान नौवहनाची स्वतंत्रता आणि समुद्राचा वैध उपयोग यासाठी अमेरिकेची कटिबद्धता दाखवून देतं.
कुठे आहे हे बेट ?
दक्षिण चीन सागरात फिलीपींसच्या लूजोन बेटाच्या पश्चिमेला जवळपास 220 किलोमीटर अंतरावर स्कारबारो एक उथळ बेट आहे. दक्षिण चीन सागरातील या बेटाला व्यस्ततम बेट म्हटलं जातं. या बेटावर फिलीपींस, चीन आणि तैवानचा दावा आहे.
अमेरिकेकडून वारंवार दिलं जातं आव्हान
2012 मध्ये चीनने इथे आपले सैनिक उतरवून फिलीपींस दावा कमकुवत केला होता. दक्षिण चीन सागरात आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणासाठी अमेरिका सक्रीय आहे. अमेरिका चीनच्या नियंत्रणाला आव्हान देण्यासाठी वेळोवेळी तिथे जहाजं पाठवत असते. अशाच एका अभियानाच्यावेळी बुधवारी स्कारबारो शोल येथे दोन्ही देशांच सैन्य भिडलं. अजूनपर्यंत दोन्ही बाजूंकडून कोणीही जखमी झाल्याची माहिती नाहीय.
