AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump Tariff Threat : ट्रम्प यांच्या धमक्या, इशाऱ्यानंतर इंडियन आर्मीचा एक मोठा निर्णय

Trump Tariff Threat : डोनाल्ड ट्रम्प भारताला दररोज धमक्या, इशारे देत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेच नुकसान करण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र, असं असूनही भारताने अमेरिकेसोबतचे संबंध खराब केलेले नाहीत. आता इंडियन आर्मीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Trump Tariff Threat : ट्रम्प यांच्या धमक्या, इशाऱ्यानंतर इंडियन आर्मीचा एक मोठा निर्णय
Donald Trump-Indian Army
| Updated on: Aug 13, 2025 | 5:48 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सध्या भारतासोबत टॅरिफवरुन वाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताला दररोज धमक्या, इशारे देत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेच नुकसान करण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र, असं असूनही भारताने अमेरिकेसोबतचे संबंध खराब केलेले नाहीत. असा कुठलाही उलट-सुलट निर्णय घेतलेला नाही, जेणेकरुन अमेरिका नाराज होईल. ज्या गोष्टी सुरु आहेत, त्याच पुढे सुरु ठेवल्या आहेत. ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची अलास्का येथे बैठक होणार आहे. त्या अलास्कामध्ये भारतीय आणि अमेरिकन सैन्य मोठा युद्ध अभ्यास करणार आहेत. हे युद्ध अभ्यासाच 21 वं वर्ष आहे. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान अमेरिकेत अलास्का येथे हा युद्धअभ्यास होईल. हा युद्ध सराव दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी होईल. हा युद्ध अभ्यास काय आहे? कसा होणार? ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेले धडे इथे कसे कामाला येतील?

‘युद्ध अभ्यास’ एक वार्षिक मिलिट्री वॉरगेम आहे. 2004 साली याची सुरुवात झाली. भारत आणि अमेरिकन सैन्यामध्ये हा युद्धाअभ्यास होतो. हा युद्ध अभ्यास आलटून-पालटून भारत किंवा अमेरिका होत असतो. मागच्यावर्षी 2024 साली 20व संस्करण राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये पार पडलेलं. यावर्षी अलास्क येथे युद्धसराव होईल. थंड आणि उंच डोंगराळ भागात अभ्यास होईल. दहशतवाद विरोधी ऑपरेशनची ट्रेनिंग हा या युद्ध अभ्यासामागे उद्देश आहे.

भारताचे किती सैनिक सहभागी होणार?

यावेळी ‘युद्ध अभ्यासा’ची रेंज आणि आव्हान जास्त आहे. भारताचे 400 सैनिक या युद्ध सरावात सहभागी होणार आहेत. मागच्यावर्षीपेक्षा ही संख्या जास्त आहे. यात मद्रास रेजिमेंटचे जवान लीड करतील. सैन्याचे सर्व विभाग पायदळ, रणगाडे आणि सहाय्यक पथकं सहभागी होतील. अमेरिकन सैन्य सुद्धा आपली टेक्निक आणि शस्त्र दाखवेल.

अमेरिका स्ट्रायकर दाखवणार

अमेरिका पाण्यात चालणाऱ्या ‘स्ट्रायकर’ कारची आवृत्ती सादर करेल. भारताने जमिनीवर चालणाऱ्या स्ट्रायकरची टेस्टिंग केली आहे. पाण्यात चालणाऱ्या वाहनाच्या टेस्टिंगची मागणी केलेली. ही टेस्ट यशस्वी ठरली, तर भारत स्ट्रायकर खरेदी करण्याचा विचार करेल.

ऑपरेशन सिंदूरमधून अमेरिकेला काय शिकायचय?

भारताला ऑपरेशन सिंदूरच्यावेळी जो अनुभव आला, अमेरिकन सैन्याला त्या अनुभवावरुन शिकायचं आहे. ऑपरेशन सिंदूर एक सैन्य कारवाई होती. भारताने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर पावलं उचलली होती. या ऑपरेशनमध्ये भारताने आपली रणनिती, ताकद आणि टेक्नोलॉजी याचा शानदार वापर केला होता.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त योजना बनवणं आणि खऱ्या युद्धासारख्या स्थितीचा अभ्यास करणं हा सरावाचा उद्देश आहे. दोन्ही सैन्य दलं दहशतवाद विरोधी मिशनची कशी तयार करतात, त्याचा अभ्यास करतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.