चीन बनवतोय छोटे अणूबॉम्ब, छोट्या शहरांना टार्गेटची योजना?, अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती…

अमेरिकेने चीनवर मोठा गंभीर आरोप लावला आहे. चीन आता मोठ्या अणूबॉम्बच्या जोडीला छोटे-छोटे अणूबॉम्ब विकसित करत आहे.साल २०३० पर्यंत चीन १००० हून अधिक आण्विक अस्रे तयार करु शकतो असेही अमेरिकेने म्हटले आहे.

चीन बनवतोय छोटे अणूबॉम्ब, छोट्या शहरांना टार्गेटची योजना?, अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती...
China is making small nuclear bomb
| Updated on: Feb 24, 2026 | 4:13 PM

आपला शेजारील देश चीनच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने गंभीर आरोप लावलेले आहेत. चीनने २२ जून २०२० रोजी शिनजियांग क्षेत्रातील लोप नूर येथे सिक्रेट आणि कमी क्षमतेच्या अणू बॉम्बची चाचणी केली आहे असा आरोप अमेरिकेने केला आहे. हा अणू स्फोट जमीनीच्या खाली करण्यात आला आणि याची तीव्रता २.७५ मॅग्निट्यूड नोंदली गेली आहे. या स्फोटाची क्षमता ५ ते १० टन टीएनटी स्फोटाएवढी असल्याचे म्हटले जात आहे.

जपानच्या हिरोशिमावर १९४५ साली टाकलेल्या अणूबॉम्बची क्षमता १५ किलो टन इतकी होती. अमेरिकेचा दावा आहे की चीनच्या या चाचणीची क्षमता हिरोशिमा बॉम्बच्या जवळपास १५०० पट कमी होते. क्षमता लहान असूनही अशा प्रकारचे अणूबॉम्ब एखाद्या छोट्या भागाचे मोठे नुकसान करु शकतात. जिन्हेवा येथील निरस्रीकरण संमेलनाच्या दरम्यान अमेरिकेचे सहायक परराष्ट्र मंत्री क्रिस्टोफर यीव्ह यांनी म्हटले आहे की चीन वेगाने त्यांच्या आण्विक बॉम्बची क्षमता वाढवत आहे.

पाच वर्षात चीन अणूक्षमतेच्या बरोबरीला

अमेरिकेने दावा केला आहे की चीन साल २०३० पर्यंत १००० हून जास्त न्युक्लिअर वॉरहेड तयार करण्यासाठीचे फिसाईल मटेरियल जमा करु शकतो. क्रिस्टोफर यीव्ह यांनी हे सांगितले की येत्या चार ते पाच वर्षात चीन अणूक्षमतेच्या बरोबरीला येऊ शकतो. मात्र त्यांनी कोणच्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो हे स्पष्ट केले नाही.चीनने मात्र या आरोपांना फेटाळले आहे.

संयुक्त राष्ट्रात चीनचे राजदूत शेन जियान यांनी सांगितले की अमेरिकेचे आरोप निराधार आहेत. ते म्हणाले चीन कोणत्याही देशासोबत अण्वस्राच्या स्पर्धेत समाविष्ट होणार नाही. आणि चीन अणू बॉम्बचा साठा अमेरिका आणि रशिया एवढा मोठा नाही. अमेरिका आणि रशिया याच्या दरम्याने न्यू स्टार्ट करार ५ फेब्रुवारी रोजी संपला आहे. ही दोन्ही देशांदरम्यानची शेवटची मोठी आण्विक शस्रास्र नियंत्रण करार होता. या करारांतर्गत दोन्ही देशांना १५५० तैनात आण्विक वॉरहेड पर्यंत मर्यादित ठेवण्यात आले होते. मात्र, दोन्ही देशांकडे मिळून १० हजाराहून अधिक अण्वस्रे आहेत.

किती खतरनाक छोटे न्यूक्लिअर बॉम्ब?

एक टन आण्विक बॉम्ब जवळपास १५० मीटरपर्यंतचा भाग नष्ट करण्यास पुरेसा आहे. तर १ किलोटन स्फोटाने ४४० मीटर अंतरापर्यंतचे ३००० रॅडपर्यंत न्युक्लिअर रेडिएशन पोहचू शकते, आणि ते अधिक धोकादायक आहे. अशावेळी ५ किलोटन स्फोटापासून सुरक्षित रहाण्यासाठी किमान १ ते २ किलोमीटर दूर होणे गरजेचे आहे.