AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पावसाळ्यातले हे 6 दिवस आजच नोट करू ठेवा, निसर्ग दाखवणार रौद्र रूप, या दिवशी घराबाहेर पडूच नका

सर्वांच लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागलं आहे. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांमध्ये मान्सूनचं आगमन केरळमध्ये होण्याची शक्यता आहे, त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू होईल.

IMD Weather Update : पावसाळ्यातले हे 6 दिवस आजच नोट करू ठेवा, निसर्ग दाखवणार रौद्र रूप, या दिवशी घराबाहेर पडूच नका
हवामान विभागाचा मोठा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 9:12 PM
Share

यंदा मान्सूच्या आगमनाला विलंब झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जेवढा मान्सूनच्या आगमनाला विलंब होईल तेवढाच विलंब पुढे खरीप हंगामातील पेरण्याला देखील होतो. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे पुढील काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मान्सून एकदा केरळमध्ये दाखल झाला की त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू होईल. सध्या महाराष्ट्रील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मान्सूनच्या आगमनाकडे.

याचदरम्यान हवामान विभागाकडून अत्यंत मोठा आणि धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या महिन्यात तब्बल ६ वेळा मुंबईत समुद्राला उधाण येणार आहे. प्रचंड उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी समुद्राकाठी जाणं टाळावं, सतर्क रहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

जून 2026 मध्ये 6 वेळा समुद्राला भरती

१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६५ २. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८० ३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८७ ४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८६ ५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७९ ६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४

यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट 

दरम्यान भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या पावसावर अल निनोच सावट असणार आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यात आहे. शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असा इशारा देखील या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अल निनोमुळे पावसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...