मृत्यू अन् विनाशासाठी चीननं 10 ट्रिलियन डॉलर द्यावेत, डोनाल्ड ट्रम्प कडाडले

वुहान प्रयोगशाळेपासून चिनी विषाणूचा उद्भव झाला. अमेरिका आणि जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने 10 ट्रिलियन डॉलर्स भरपाई द्यावी, असंही त्यांनी सांगितलंय. Donald Trump

मृत्यू अन् विनाशासाठी चीननं 10 ट्रिलियन डॉलर द्यावेत, डोनाल्ड ट्रम्प कडाडले
Donald Trump
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:21 PM

वॉशिंग्टनः डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसवरून चीनला पुन्हा एकदा फटकारले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल चीनला जबाबदार धरलेय. वुहान लॅब थिअरीवरील जागतिक चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एक विधान जारी केले. ते म्हणाले आहेत की, ‘प्रत्येक जण, अगदी तथाकथित शत्रूलादेखील असा विश्वास आहे की अध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे बरोबर आहे. वुहान प्रयोगशाळेपासून चिनी विषाणूचा उद्भव झाला. अमेरिका आणि जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने 10 ट्रिलियन डॉलर्स भरपाई द्यावी, असंही त्यांनी सांगितलंय. (China should pay 10 trillion for death and destruction, says Donald Trump)

कोरोना विषाणूला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस म्हणून संबोधतात

डोनाल्ड ट्रम्प अनेकदा कोरोना विषाणूला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस म्हणून संबोधतात. ज्यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदविला होता, तसेच त्यांना वर्णद्वेषीही म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेची टीम देखील वुहान विषाणूच्या उत्पत्तीची तपासणी करण्यासाठी पोहोचली, जिथे या पथकाने साथीच्या संबंधित गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अहवालात या संघटनेने म्हटले आहे की, वुहान लॅबमधून विषाणूचा उद्भव झाला हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. जोपर्यंत ही टीम चीनमध्ये होती, तोपर्यंत तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले.

चीनने माहिती लपवली होती

तपासात डब्ल्यूएचओ टीमला पूर्णपणे सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा चीनवर आरोप होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, नोव्हेंबर 2019 मध्ये त्याच प्रयोगशाळेतून तीन जणांना कोविडसारखी लक्षणे दिसली होती. चीनने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले होते. कोणत्याही प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विषाणूच्या उत्पत्तीची चौकशी करून 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

फॉसीचे खासगी मेल आले समोर

अमेरिकेच्या प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी (Anthony Fauci) यांचे काही वैयक्तिक मेलही समोर आलेत. डॉ. फॉसी यांना यू. एस. बायोमेडिकल रिसर्च टीमच्या संचालकाकडे पाठविण्यात आले होते. जानेवारी 2020 मध्ये पाठविलेल्या या मेलमध्ये असे म्हटले होते की, या विषाणूमध्ये काहीतरी असामान्य आहे. हा विषाणू तयार करण्यात आला आहे. उत्तरादाखल डॉक्टरांनी त्यांना फोनवर बोलण्यास सांगितले. त्यांनी असेही म्हटले आहे की, व्हायरस नैसर्गिकरित्या जन्मला आहे, याची आपल्याला खात्री नाही, याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.

संबंधित बातम्या

यूएईतील उद्योजकामुळे आयुष्याची ‘डोर’ बळकट, एक कोटींमुळे भारतीय तरुणाचा मृत्युदंड टळला

फ्रान्समध्ये विमानात स्फोटकं आढळली, पॅरिस विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी कट उधळला

China should pay 10 trillion for death and destruction, says Donald Trump

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.