फ्रान्समध्ये विमानात स्फोटकं आढळली, पॅरिस विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी कट उधळला

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक संशयित दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय.

फ्रान्समध्ये विमानात स्फोटकं आढळली, पॅरिस विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी कट उधळला


Explosive device found on plane at Paris Airport पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक संशयित दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. पॅरिस विमानतळावर सुरक्षारक्षांना एका विमानात संशयित स्फोटकं आढळल्यानंतर हा कट उघड झाला. हे विमान आफ्रिकेतील चार या देशातून आलं होतं. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (3 जून) पंतप्रधानांच्या निर्देशानुसार क्रायसिस युनिटने एअर फ्रान्सच्या विमानातून संशयित स्फोटक यंत्र बाजूला काढलं (Terrorist try to blast a plane in Paris France by explosive device).

गृहमंत्री गेराल्ड म्हणाले, “विमानाला रोएसी चार्ल्स डि गुआले विमानतळावर कोणत्याही अडचणीशिवाय सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. या विमानाला पूर्णपणे वेगळं करण्यात आलंय. तसेच संशयित बॉम्बच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी फ्रान्स सरकारने तात्काळ क्रायसिस टीमची स्थापना केलीय. यात सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही मंत्र्यांचाही समावेश आहे. यात यूरोप आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री, संरक्षण मंत्री आणि परिवहन मंत्र्यांचाही समावेश आहे.”

पोलिसांवर हल्ला

फ्रान्समध्ये मागील काही दिवसांपूर्वीच एका इस्लामिक कट्टरतावादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाळतीखाली असलेल्या व्यक्तीने पोलिसांवर हल्ला केला होता. तो सित्जोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचंही सांगण्यात आलं. त्याने एका पोलीस स्टेशनमध्ये घूसून दोन अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या आणि एकावर चाकू हल्ला केला होता.

हेही वाचा :

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 2 युवकांची हत्या, सैन्याकडून परिसराची कडक नाकेबंदी

दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी

धूमसते काश्मीर, 72 तासात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, वाचा 4 ऑपरेशन्सची माहिती सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Terrorist try to blast a plane in Paris France by explosive device

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI