दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी

दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक दवेंदर सिंह याची हकालपट्टी झालीय.

दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 4:36 AM

श्रीनगर : दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक दवेंदर सिंह याला उपराज्यपालांनी कायमस्वरुपी नोकरीवरुन काढून टाकले आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या या आरोपी पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. याशिवाय सिन्हा यांनी कुपवाडा जिल्ह्यातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या दोन शिक्षकांनाही काढून टाकले आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय (DSP Davinder Singh removed form Police force for connection with terrorist).

दवेंदर सिंह (Davinder Singh) याच्यावर दहशतवादी संघटना हिजबूलशी (hizbul mujahideen) संबंध असल्याचा आणि त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपी दवेंदर सिंहविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. दविंदर सिंहच्या व्यतिरिक्त कुपवाडाच्या दोन शिक्षकांनाही काढून टाकण्यात आलं. या सर्वांवर संविधानाच्या कलम 311 अंतर्गतच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आलीय.

मागीलवर्षी दवेंदर सिंहला दहशतवाद्यांसोबत अटक

मागील वर्षीच दवेंदर सिंहला काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिदीन संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आली (Hizbul Mujahideen). दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे ही कारवाई करण्यात आली होती. देविंदर सिंह अतिरेक्यांसोबत एकाच गाडीमध्ये होता. देविंदर सिंह ती गाडी चालवत होता, अशी माहिती उपमहानिरीक्षक अतुल गोयल यांनी दिली होती.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी देविंदर सिंह यांच्या घरी देखील धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एक AK 47, दोन पिस्तूल आणि तीन हॅण्ड ग्रेनेड मिळाले होते. पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्टला दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रपती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस निरिक्षक या पदवरुन त्यांची पोलीस उपअधीक्षकपदावर पदोन्नती करण्यात आली होती.

दवेंदर सिंहचा काळा भूतकाळ

दवेंदर सिंहचा भूतकाळ असाच राहिलाय. याआधी त्याला 1992 मध्ये ड्रग्ज प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं. 2001 साली संसद भवनावर हल्ला झाल्ला होता. या हल्ल्याचा आरोपी अफजल गुरु याला 2013 साली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यावेळी याप्रकरणाशी दवेंदर सिंह याचा देखील संबंध असल्याचं समोर आलं होतं. अफजल गुरुने फाशीची शिक्षा होण्याआधी याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी दवेंदर सिंह स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा सदस्य होता.

अफजल गुरुने आपल्या पत्रात काय म्हटलं होतं?

अफजल गुरुने तिहार जेलमध्ये आपल्या वकीलांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, “बडगामच्या हमहमा येथे तैनात असलेले डीएसपी दवेंदर सिंह यांनी मला मोहम्मद नावाच्या हल्लेखोराला दिल्ली घेऊन जाण्यास सांगितलं. तसेच तिथे त्याला भाड्याने घर खरेदी करुन देण्याचा आणि त्याच्यासाठी कार खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता.” 9 फेब्रुवारी 2019 ला अफजल गुरुला फाशी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ते पत्र सार्वजनिक केले होते.

दवेंदर सिंह जम्मू-काश्मीर पोलीसच्या अँटी हायजॅकिंग स्कॉडमध्ये होता. त्या अगोदर खंडणीप्रकरणी त्याला स्पेशल ऑपरेशन ग्रुपमधून काढण्यात आले होते. त्याला काही काळासाठी निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्याला श्रीनगर पीसीआरमध्ये तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा :

दोन कुख्यात दहशतवाद्यांसह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्याला अटक

गणिताचा शिक्षक ते हिजबुलचा टॉप कमांडर, 12 लाखांचं बक्षीस असलेला रियाज नायकू चकमकीत ठार

पाकिस्तानचा पर्दाफाश, आयएसआयचा अधिकारीच हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख

व्हिडीओ पाहा :

DSP Davinder Singh removed form Police force for connection with terrorist

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.