AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचे नवे स्टेल्थ फायटर J-35AE दाखल, पाकिस्तानला मिळणार? भारतासाठी काय धडा ?

चीनने J-35AE स्टेल्थ फायटरचा व्हिडीओ जारी केला आहे. हे ट्विन-इंजिन असणारे अत्याधुनिक स्टेल्थ जेट आहे. या स्टेल्थ जेट फायटरची चीन पाकिस्तानला विक्री करणार अशी चर्चा आहे.

चीनचे नवे स्टेल्थ फायटर J-35AE दाखल, पाकिस्तानला मिळणार? भारतासाठी काय धडा ?
J-35AE
| Updated on: May 02, 2026 | 5:02 PM
Share

चीनने आपल्या नवीन स्टेल्थ फायटर जेट J-35AE चा व्हिडीओ जारी केला आहे. हा २ मे रोजी स्टेट ब्रॉडकास्टर CCTV वर दाखवला गेला. J-35AE हे चीनच्या एडव्हान्स्ड ट्वीन- इंजिन स्टेल्थ फायटरचा एक्सपोर्ट व्हर्जन आहे. यात ब्लेंडेट-विंग डिझाईन आहे.जे शत्रूच्या रडारपासून लपण्यास मदत करते. हे एक मल्टी रोल फायटर आहे. म्हणजे ते हवेतील लढाई, जमीनीवर हल्ला आणि अन्य अनेक काम करु शकते. चीनने यास २०२६ ची मोठी उपलब्धी म्हटले आहे.

चीनचे J-35AE हे दोन इंजिन असलेले स्टेल्थ फायटर आहे. याचे डिझाईन एकदम आधुनिक आहे. ब्लेंडेड-विंग बॉडीमुळे हे रडारवर कमी दिसते. हे फायटर जेट शत्रूच्या मुलुखात आतपर्यंत घुसून हल्ला करु शकते आणि पुन्हा सुरक्षित परत येऊ शकते. चीनने दावा केला आहे की हे विमान त्याच्या क्लासमध्ये चांगला परफॉर्मेंस देईल. हे जेट न केवळ हवेत दुसऱ्या विमानांशी लढू शकते, तर जमीनीवर टार्गेटना देखील अचूक हल्ले करु नष्ट करु शकते.

पाकिस्तानला विकण्याची चर्चा ?

हा व्हिडीओ जारी झाल्यानंतर चीन पाकिस्तानला ३० ते ४० J-35AE जेट विकू शकतो अशा चर्चा सुरु झाली आहे. ही डिलिव्हरी २०२६ च्या मध्यावर होऊ शकते. पाकिस्ताने आधीच चीनकडून J-10C फायटर जेट खरेदी केलेले आहे. त्याचे पायलट प्रशिक्षण देखील घेत आहेत. दोन्ही देशात डिफेन्स पार्टनरशिप देखील मजबूत आहे.जर ही डील झाली तर पाकिस्तानच्या वायू दलाची ताकद वाढणार आहे. J-35AE सारखे स्टेल्थ फायटर भारतासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

चीन पाकिस्तानला हे स्टेल्थ फायटर जेट विकेल याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.या संदर्भात तज्ज्ञ @RupprechtDeino यांनी सांगितले की या संदर्भात बोलताना सांगितले की व्हिडीओ आणि केवळ चर्चांवरुन ही डील होणार हे मानने चुकीचे ठरेल. चीन शस्रास्रांचा मोठा निर्यातदार बनत चालला आहे. मात्र, हा करार लगेच होईल असे म्हणता येत नाही. मागे चीन इंडोनेशियाला देखील J-10C विकले जाणार असल्याची बातमी निराधार निघाली आहे.

चीनच्या शस्रास्र निर्यातीत वाढ

चीन आता जगभरात शस्रास्रे विक्रीत पुढे जात आहे. J-35AE एक्सपोर्ट व्हर्जन जारी करणे या रणनितीचा एक भाग वाटत आहे. यामुळे चीन केवळ पैसे कमवत नाही तर आपल्या सहकारी देशांची सैन्य ताकदही वाढवत आहे. जर पाकिस्तान सोबत हा करार झाला तर दक्षिण आशियातील शस्रास्रांची स्पर्धा आणखीन तीव्र होईल.

भारतासाठी काय धडा ?

जर पाकिस्तानला चीनने J-35AE विकली तर भारतीय वायू सेनेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकते. स्टेल्थ टेक्नॉलॉजीचे जेट फायटर रडारपासून वाचून अचानक हल्ले करु शकतात. भारताने देखील आपल्या स्टेल्थ आणि एडव्हान्स फायटर जेटची क्षमता वाढवण्यावर लक्ष द्यावे लागेल. J-35AE चा व्हिडीओ चीनची वाढती ताकद आणि निर्यात महत्वाकांक्षा दाखवते. पाकिस्तानला होणारी संभाव्य विक्रीच्या बातम्या देखील अनौपचारिक आहेत. परंतू त्या जर खऱ्या झाल्या तर क्षेत्रीय सुरक्षेवर मोठा परिणाम होईल. आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है