भारताने करून दाखवले, चीनमध्ये हाहाकार, थेट सर्वात मोठा दणका, 2 वेळा..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका उडाला आहे. स्थिती भयंकर होत आहे. त्यामध्येच आता होर्मुज खाडीत अधिक तणाव वाढताना दिसत आहे. नुकताच होर्मुज खाडीत जगाला ज्याची भीती होती, असा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भारताने करून दाखवले, चीनमध्ये हाहाकार, थेट सर्वात मोठा दणका, 2 वेळा..
xi jinping
| Updated on: Apr 16, 2026 | 7:46 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, या काळातही तणाव वाढताना दिसत आहे. स्थिती अधिक घातक होत आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद असतानाही आपल्या मित्र देशांचे जहाज सोडले जात होते. इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकला नसल्याने धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला आणि होर्मुज खाडीला नाकेबंदी केली. भारत, चीन, पाकिस्तान यांची जहाजे थोड्या बहोत प्रमाणात इराणकडून युद्धादरम्यान सोडली जात होती. मात्र, परिस्थिती आता चिघळताना दिसत आहे. याचा सर्वात मोठा फटका चीनला बसला. होर्मुज खाडीत भयंकर घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर पूर्णपणे नाकाबंदी केली. इराणचे एकही जहाज त्यांच्या बंदरातून बाहेर पडू शकत नाहीये. ही नाकाबंदी इराणी बंदरांवर आहे पण युएईवरून निघालेल्या चीनी जहाजाला मोठा दणका बसला.

पूर्णपणे लोड असलेल्या चीनी जहाजाला 48 तासात दोनदा होर्मुज खाडीतून परत यावे लागले. चीनचे जहाज होर्मुज जवळून दोनदा परत वापस येताना दिसले. या घटनेनंतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, होर्मुज खाडीत कोणत्याही देशाला कोणत्याही प्रकारची विशेष सूट देण्यात आली नाहीये. मिंगकुन टेक्नोलॉजीच्य रिपोर्टनुसार, रिच स्टारी नावाचे जहाज मंगळवारी दुपारी होर्मुज खाडी पार करून ओमान खाडीत पोहोचले.

पण त्याला 3 वाजता लगेचच यूटर्न घ्यावा लागला. ज्या रस्त्यांनी हे जहाज गेले होते, त्याच रस्त्याने परतले. बुधवारी रात्रीपर्यंत हे जहाज इराणच्या लारक व्दीपच्या दक्षिण आणि पश्चिम लंगरमध्ये उभे होते. 188 मीटर दूर तेल आणि केमिकल घेऊन हे जहाज सोमवारी युएईच्या शारजाह वरून होर्मुज खाडीकडे निघाले होते. पण चोक पाईंटवर पोहोचल्यानंतर काही मिनिटात जहाज पुन्हा वापस आले. हा चीनसाठी अत्यंत मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदीनंतरही होर्मुज खाडीत स्थिती सामान्य होताना दिसत नाही. होर्मुज खाडीत स्थिती अधिक भयंकर होताना दिसत आहे. त्यामध्येच आता एका मागून एक धक्के बसत आहे. चीनने अगोदरच आमच्यात हस्तक्षेप न करण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे. भारताचे एक जहाज होर्मुज खाडीतून सुरक्षित निघाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us