AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉलरची बादशाहत संपणार, चीनचे युआन आता जागतिक चलन? डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली!

USD vs Chinese Yuan : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच अमेरिकेला एक संदेश दिला आहे. एका भाषणात जिनपिंग यांनी डॉलरचा दबदबा आता संपला असून जगाला एका नव्या चलनाची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

डॉलरची बादशाहत संपणार, चीनचे युआन आता जागतिक चलन? डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली!
usd vs yuanImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 02, 2026 | 3:25 PM
Share

अमेरिकेचे चलन डॉलरचे जागतिक बाजारपेठेत वर्चस्व आहे. जागतिक व्यापार हा डॉलरच्या माध्यमातून केला जातो. मात्र आता चीनच्या जागतिक चलनाबाबतच्या एका घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच अमेरिकेला एक संदेश दिला आहे. एका भाषणात जिनपिंग यांनी म्हटले की, डॉलरचा दबदबा आता संपला आहे आणि जगाला अशा चलनाची आवश्यकता आहे. जगाला असे चलन हवे आहे ज्यावर सर्व देशांना विश्वास ठेवता येईल. चीन एका मजबूत चलनाच्या दिशेने काम करत आहे आणि युआनला जागतिक राखीव चलन म्हणून स्थापित करण्याचे ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात आहे.

चीनच्या इशाऱ्याने अमेरिकेची चिंता वाढली

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढे आपल्या भाषणात म्हटले की, ‘चीनला आर्थिक महासत्ता बनण्यासाठी मजबूत आर्थिक पाया, जागतिक दर्जाची आर्थिक आणि तांत्रिक क्षमता आणि विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर वापरले जाणारे चलन आवश्यक आहे. यासाठी चीनची मध्यवर्ती बँक चलन धोरण आणि मॅक्रोप्रुडेन्शियल व्यवस्थापन प्रभावीपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वित्तीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आवश्यक आहेत. जी जगभरातून भांडवल आकर्षित करू शकतील आणि जागतिक किमतींवर प्रभाव टाकू शकतील.’

शी जिनपिंग यांचे हे भाषण “च्युशी” या चिनी मासिकात प्रकाशित झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शी जिनपिंग यांनी हे भाषण 2024 मध्ये दिलेले. मात्र आता ते आता 2026 च्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात आले आहे. जागतिक तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढवणारे हे भाषण असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प ब्रिक्सवर नाराज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्यांना आव्हान दिलेले आहे. याआधी त्यांनी भारत, चीन आणि रशिया सदस्य असलेल्या ब्रिक्स गटावर 100% कर लादण्याची धमकी दिली आहे. या देशांनी डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिक्स गट लवकरच एक कॉमन डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्याची तयारी करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी