पेनरोज यांच्या नोबेलमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं मोठं योगदान, अमल कुमारांच्या अनोख्या समीकरणानं ब्‍लॅक होलचं गुपित उघड

पेनरोज यांच्या नोबेल पुरस्कारात कोलकात्यातील भौतिकशास्त्रज्ञ अमल कुमार रायचौधरी यांच्या संशोधनाचं महत्त्वाचं योगदान आहे (Contribution of Indian researcher in Roger Penrose Nobel prize).

पेनरोज यांच्या नोबेलमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं मोठं योगदान, अमल कुमारांच्या अनोख्या समीकरणानं ब्‍लॅक होलचं गुपित उघड
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 7:07 PM

स्टॉकहोम : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ डॉ. रोजर पेनरोज यांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार मिळाला. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात प्राध्यापक असलेल्या पेनरोज यांनी याआधी स्टीफन हॉकिंग यांच्यासोबत ब्लॅक होलवर काम केलं होतं. मात्र, पेनरोज यांच्या संशोधनाचा संबंध भारताशी देखील आहे. त्यांच्या या शोधासाठी त्यांना कोलकात्यातील भौतिकशास्त्रज्ञ अमल कुमार रायचौधरी यांच्या संशोधनाची मदत झाली आहे (Contribution of Indian researcher in Roger Penrose Nobel prize). अमल कुमार रायचौधरी यांनी शोधलेल्या जनरल रिलेटिव्हिटीच्या रायचौधरी समीकरणाची पेनरोज यांना खूप मदत झाली होती.

यंदाचा फिजिक्समधील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) रोजर पेनरोज (Roger Penrose), रेनहार्ड गेंजेल (Reinhard Genzel) आणि अँड्रिया गेज (Andrea Ghez) यांना मिळाला आहे. पुरस्कारातील अर्धी रक्कम पेनरोज यांना देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम रेनहार्ड आणि अँड्रिया या दोघांना दिली जाणार आहे.

पेनरोज यांनी कॉस्मोलॉजिस्ट (Cosmetologist) स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांच्यासोबत काम केलं होतं. रायचौधरी यांनी 1955 मध्ये ‘फिजिकल रिव्ह्यू’मध्ये ब्लॅक होलविषयी एक गणितीय समीकरण मांडलं होतं. त्याच समीकरणाचा उपयोग पेनरोज यांनी 1969 मध्ये ब्लॅक होलच्या गणितीय मांडणीसाठी केला होता.

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ अमल कुमार रायचौधरी (Amal Kumar Raychaudhuri) यांनी 1950 च्या दरम्यान आशुतोष कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं होतं. याच काळात त्यांनी गणितीय समीकरणावर काम केलं. त्यांचा हा संशोधन प्रबंध 1955 मध्ये प्रकाशित झाला होता. त्यावेळी रायचौधरी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्समध्ये शिकत होते.

रायचौधरी आणि पेनरोज पहिल्यांदा 1987 मध्ये जादवपूर विश्वविद्यालयाच्या कार्यशाळेत एकमेकांना भेटले होते. त्यावेळी IISER चे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक नरेंद्र बॅनर्जी देखील तेथे उपस्थित होते. नरेंद्र बॅनर्जी सांगतात, “रायचौधरी यांनी त्या विलक्षण स्तरावर पोहचण्यासाठी ज्यामितिचा उपयोग केला होता. तेथे गेल्यावर भौतिकशास्त्राचे नियम तुटतात. गुरुत्वाकर्षणाविषयी भौतिक प्रमाण अधिक झाल्याने अंतराळाची वेळ खूप मोठी होते. पेनरोज आणि हॉकिंग दोघांनीही अनेकवेळा रायचौधरी यांच्या योगदानाबद्दल मान्यता दिली आहे.”

संबंधित बातम्या :

Nobel Peace Prize | ‘युद्धजन्य भागातही पोटाची भूक शमवली’, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला

Nobel Prize in Physics | 1901 पासून आतापर्यंत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या 4 महिला संशोधक

Nobel Prize in Physics| रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

Contribution of Indian Astrophysics researcher in Nobel prize of Roger Penrose Black Hole

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.