AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran Ceasefire : पाकिस्तानला कसं वापरलं त्याचा ढळढळीत पुरावा, कॉपी-पेस्ट पोस्टमधून मोठी पोल-खोल, शरीफ तोंडावर पडले

US Iran Ceasefire for 2 Weeks : अमेरिका-इराणमध्ये युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला दिलं जात आहे. पण पाकिस्तानचा यात फक्त वापर झालाय. त्याचा धडधडीत पुरावा समोर आलाय. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवर जी पोस्ट केली, त्यातून मोठी पोल-खोल झालीय.

US Iran Ceasefire : पाकिस्तानला कसं वापरलं त्याचा ढळढळीत पुरावा, कॉपी-पेस्ट पोस्टमधून मोठी पोल-खोल, शरीफ तोंडावर पडले
Shenbaz Sharif
| Updated on: Apr 08, 2026 | 9:40 AM
Share

मध्य पूर्वेत मागच्या 38 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला विनाशकारी हल्ल्याची धमकी दिली होती. इराणमधील नागरी प्रकल्प उद्धवस्त करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला अवघा एक तास उरलेला असताना युद्धाविरामाची घोषणा झाली. ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली. या युद्धविरामात पाकिस्तानने महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. या दरम्यान पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांचं Draft आणि Edited चं टि्वट वादात सापडलं आहे.

पाकिस्तान मागच्या काही दिवसांपासून युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थतेचे प्रयत्न करत होता. युद्ध सुरु असताना पडद्यामागे चर्चा सुद्धा सुरु होत्या. राष्ट्रपती ट्रम्प यांनी युद्ध सुरु केल्यापासून इराणने माघार घ्यावी यासाठी ते सतत धमक्या आणि डेडलाइन देत होते. यावेळी त्यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि मोठ मोठ्या ब्रिजेसना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. पण डेडलाइन संपायला तासभर उरलेला असताना त्यांनी युद्धविरामाची घोषणा केली. जगासाठी ही चांगली बाब आहे.

रात्री उशिरा एक्सवर पोस्ट

युद्ध सुरु झाल्यापासून ट्रम्प यांनी काहीवेळा डेडलाइन दिली. पण ती पूर्ण होण्याआधीच ते मागे हटत होते. यावेळी सुद्धा असचं झालं. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रात्री उशिरा एक्सवर एक पोस्ट केली. यात शरीफ यांनी, ट्रम्प यांच्याकडे डेडलाइची मुदत आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची विनंती केली होती. जेणेकरुन मधल्याकाळात चर्चा होईल. त्याचवेळी त्यांनी या पोस्टमध्ये इराणकडे दोन आठवड्यांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करण्याची मागणी केली होती.

x post

शरीफ यांच्या टि्वटची पोल-खोल

पण पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांची ही पोस्ट वादात सापडली. 7 आणि 8 एप्रिलच्या रात्री 12.46 वाजता शरीफ यांनी जी पोस्ट केली, त्यात Draft – Pakistan’s PM Message on ‘X’ लिहिलं आहे. त्यानंतर पुढे त्यांची लांबलचक पोस्ट आहे. असं म्हटलं जातय की ही पोस्ट स्वत: शरीफ यांनी लिहिलेली नाही. ज्या पद्धतीने Draft मेसेज लिहिलय त्यावरुन असं वाटतय की, पाकिस्तानी पीएम शरीफ यांच्या टीमने हा ड्राफ्ट मेसेज केलेला नाही. बाहेरुन आलेला ड्राफ्ट मेसेज वाटतोय. कुठल्याही देशाची PM ची टीम आपल्याचं पंतप्रधानाच्या ड्राफ्ट मेसेजच्या पुढे देशाचं नाव लिहित नाही.

काय प्रश्न निर्माण झाले?

शरीफ यांच्या टीमला एक मिनिटाच्या आत आपली चूक लक्षात आली. 12.47 वाजता मेसेज एडिट करुन थेट पोस्ट केला. एका मिनिटाच्या आत Draft मेसेज हटवून थेट पोस्ट केल्याने सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. हा मेसेज ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवला होता का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....