AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : दहशतवादी रौफच्या मृत्यूमुळे पाकिस्तान दु:खात, निर्घृण हत्या झालेला पत्रकार डॅनियल पर्लच्या वडिलांकडून फक्त एकच प्रश्न

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अब्दुल रौफ अझहरसह सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार मारले. अझहरने आयसी-814 अपहरणात भूमिका बजावली होती, ज्यामुळे उमर सईद शेखची सुटका झाली,त्यानेच डॅनियल पर्लची हत्या झाली. अझहरच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे डॅनियल पर्लच्या वडिलांनी पाकिस्तानवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Operation Sindoor : दहशतवादी रौफच्या मृत्यूमुळे पाकिस्तान दु:खात, निर्घृण हत्या झालेला पत्रकार डॅनियल पर्लच्या वडिलांकडून फक्त एकच प्रश्न
डॅनिअल पर्ल हत्याImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 10, 2025 | 9:16 AM
Share

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला दहशतवादविरोधी मोठे यश मिळाले आहे. या लष्करी कारवाईत सुमारे 100 दहशतवादी मारले गेले, ज्यात कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रौफ अझहरचाही समावेश होता. अब्दुल रौफ हा तोच दहशतवादी आहे जो 1999 सालच्या आयसी-814 अपहरण प्रकरणात सहभागी होता आणि ज्याच्या भूमिकेमुळे दहशतवादी अहमद उमर सईद शेखची सुटका झाली होती. त्याच दहशतवाद्याने 2002 मध्ये अमेरिकन-ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करून हत्या केली होती.

ऑपरेशन सिंदूरमध्ये अब्दुल रौफ अझहर मारला गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आणि शोक व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधण्यात आले.

डॅनियल पर्लचे वडील, ज्यूडियन पर्ल यांनी शुक्रवारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट लिहीत कडक टीका केली. ” तुम्ही खरोखर कशासाठी शोक करत आहात? तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या आदर्शांचा आदर करायला शिकवत आहात? या माणसाकडून तुम्ही काय शिकलात? हे या मान्यवरांनी आम्हाला सांगावे ” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

डॅनियल पर्ललाही मिळाला न्याय

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांना लक्ष्य करून, केवळ पहलगाम हल्ल्यातील पीडितांनाच नव्हे तर आयसी-814 अपहरण आणि डॅनियल पर्लच्या हत्येतील पीडितांनाही न्याय मिळाला, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी सांगितले.ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या या कारवाईत नष्ट झालेल्या नऊ दहशतवादी संरचनांपैकी एक बहावलपूरमध्ये देखील आहे, जो जैश-ए-मोहम्मदचा एक प्रमुख तळ मानला जातो आणि पर्लच्या हत्येत सहभागी असलेले दहशतवादी तेथूनच काम करत होते.

बहावलपूरवर भारतीय हवाई हल्ला

बहावलपूरवरील प्रत्युत्तराची कारवाई ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर आंतरराष्ट्रीय दहशतवाद केंद्र नष्ट करण्यासाठी तो एक धोरणात्मक पुढाकार होतो, असे मिस्री म्हणाले.डॅनियल पर्लच्या हत्येसाठी जैश-ए-मोहम्मद आणि त्याच्याशी संबंधित संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. बहावलपूरवरील कारवाई ही या क्रूर हत्येला योग्य आणि आवश्यक प्रतिसाद आहे.

विशेष म्हणजे, बहावलपूर हा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला मानला जातो. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला मसूद अझहर हा त्याचे नेतृत्व करतो.

Follow Us
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत