AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या आणखी एका शत्रूचा पाकमध्ये खात्मा, मसूद अझहरचा साथीदार दाऊद मलीक ठार

भारताला हव्या असलेल्या मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांच्या पाकिस्तान आणि जगात इतरत्र अज्ञात मारेकऱ्यांकडून लागोपाठ हत्या होण्याचा सिलसिला काही थांबलेला नाही. आता लश्कर-ए-जब्बारचा संस्थापक ठार झाला आहे.

भारताच्या आणखी एका शत्रूचा पाकमध्ये खात्मा, मसूद अझहरचा साथीदार दाऊद मलीक ठार
DAWOOD MALIKImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 21, 2023 | 10:46 PM
Share

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : पाकिस्तानात भारताच्या शत्रू असलेल्या वॉण्टेड अतिरेक्यांच्या हत्येचा सिलसिला सुरुच आहे. शाहीद लतिफ आणि मुल्ला बाहौर नंतर आता लश्कर – ए – जब्बारचा संस्थापक दाऊद मलीक याची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या झाली आहे. पाकिस्तान उत्तरी वजीरीस्तान भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या घातल्याने तो ठार झाला. दाऊद मलिक हा वॉण्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा जवळचा साथीदार मानला जातो.

पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार शुक्रवारी सकाळी उत्तरी वजीरीस्तान आदिवासी जिल्ह्याच्या मिराली परिसरात अज्ञात बुरखेधाऱ्यांनी घात लावून दाऊद मलिक याच्यावर गोळीबार केला. मलिक याला एका खाजगी क्लिनिकमध्ये मारेकऱ्यांनी ठार केले आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले.

मसूद अझहरचा जवळचा साथीदार

दाऊद मलिक भारताचा मोस्ट वॉण्टेड अतिरेकी मौलाना मसूद अझहर याचा जवळचा साथीदार मानला जातो. या ताज्या घटनेने पाकिस्तान सक्रीय अतिरेकी संघटनात सुरु असलेल्या धुमश्चक्रीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. गेल्या काही आठवड्यात भारताला हवे असलेले अनेक अतिरेकी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात लागोपाठ ठार झाले आहेत.

आपआपसातील धुमश्चक्रीत होत आहेत ठार

या आधी 11 ऑक्टोबर रोजी भारताला हवा असलेला सगळ्यात मोठा दहशतवादी आणि 2016 रोजी पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार शाहीद लतिफ याची पाकिस्तानच्या सियालकोट भागात अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या झाली. तर 1 ऑक्टोबर रोजी लश्कर-ए-तोयबाचे माजी सदस्य आणि मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याचा साथीदार मुफ्ती कैसर फारुक याची पाकिस्तान हत्या झाली. ही घटना लश्कर ए तोयबाशी संबंधित अन्य मौलवी मौलाना जियाउर्रहमान याच्या हत्येशी खूपच जुळत आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान