AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या शहराला ‘इंजिनिअरींग सिटी’ म्हटले जाते ? पाहा कोणते ते शहर

भारतातील अनेक शहरांची खुबी तुम्हाला माहीती असेल. प्रत्येक शहराला तेथील वैशिष्ट्यांमुळे स्वत:ची खास ओळख मिळाली आहे, परंतू भारतातील एका शहराला 'इंजिनिअरिंग सिटी' म्हटले जाते..पाहा कोणते ते शहर

भारतातील या शहराला 'इंजिनिअरींग सिटी' म्हटले जाते ? पाहा कोणते ते शहर
Engineering Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 21, 2023 | 9:26 PM
Share

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : भारतात शहराची संख्या 7000 इतकी आहे. भारतातील 28 राज्यात आणि 8 केंद्रशासित प्रदेशात मिळून ही सात हजार शहर वसली आहेत. प्रत्येक शहराचं आगळं वेगळं वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे ही शहरं देश आणि परदेशात प्रसिध्द आहेत. अशात तुम्हाला माहिती आहे का देशातील या एका शहराला देशाची ‘इंजिनिअरींग सिटी‘ म्हणून ओळखले जाते. जर तुम्हाला माहिती नसेल ते कोणते शहर तर पाहूया कोणते आहे ते शहर ?

भारतातील अनेक शहरांची खुबी तुम्हाला माहीती असेल. प्रत्येक शहराला तेथील वैशिष्ट्यांमुळे स्वत:ची खास ओळख मिळाली आहे. या शहरांना राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळाली आहे. देश विदेशाती लोक भारतातील या शहरांमध्ये पर्यटनासाठी नोकरीसाठी वा राहण्यासाठी येत असतात. परंतू एका शहराला इंजिनिअर सिटी म्हणून ओळखले जाते.

देशात इंजिनिअर बनण्यासाठी दरवर्षी अनेक तरुणांमध्ये स्पर्धा असते. शालेय शिक्षण झाल्यानंतर तरुणांचा मोठी संख्या इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेते. वेगवेगळ्या अहवालानूसार देशात दरवर्षी 12 ते 15 लाख इंजिनिअरची निवड करतात. परंतू NASSCOM च्या 2019 च्या सर्वेच्या मते यातील केवळ 2.5 लाख इंजिनिअरच कोअर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये असतात.

का म्हटले जाते इंजिनिअरिंग सिटी

देशातील तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर शहराला इंजिनिअरिंग सिटी म्हटले जाते. वास्तविक कोईम्बतूर मुख्यत: कापसासाठी प्रसिद्ध आहे. येथे कापसाची शेती होते. त्यामुळे कोईम्बतूरला दक्षिण भारताचे मॅंचेस्टर म्हटले जाते. तसेच येथे ऑटोमेटीव्ह पार्ट्स तयार होतात. देशातील दोन प्रमुख कार कंपन्यांचे 30 टक्के पार्ट्स येथे तयार होतात. तसेच या शहरात अनेक इंजिनिअरिंग औद्योगिक कंपन्या देखील आहेत. त्यामुळे या शहराला इंजिनिअरिंग सिटी म्हटले जाते.

कोईम्बतूर पर्यटनासाठीही प्रसिद्ध

जर तुम्हाला पर्यटनासाठी येथे जायचे असेल तर येथे जगप्रसिद्ध 112 फूट उंचीची आदियोगी शिव यांचा पुतळा आहे. 500 फूट उंचावरील मरुधमलाई मंदिर, श्री अय्यप्पन मंदिर आणि जीडी नायडू संग्रहालय देखील आहे. या ठिकाणी तुम्हाला जगातील जुन्या कारचे कलेक्शन देखील पाहायला मिळेल.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.