AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : तर 100 टक्के टॅरिफ लावू.. ट्रम्प यांचे पुन्हा ‘टॅरिफास्त्र’, या देशांना मोठा इशारा; भारत…

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'डिजिटल सेवा कर' (DST) लावणाऱ्या देशांना १००% शुल्क आकारण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन कंपन्यांवर कर लादल्यास व्यापार करार रद्द केले जातील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युरोपीय देशांच्या या भूमिकेला अमेरिकेचा विरोध आहे. यामुळे जागतिक व्यापारात तणाव वाढला असून, ब्रिटीश आणि फ्रेंच वाईनवरही शुल्क आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Donald Trump : तर 100 टक्के टॅरिफ लावू.. ट्रम्प यांचे पुन्हा 'टॅरिफास्त्र', या देशांना मोठा इशारा; भारत...
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
| Updated on: Jun 27, 2026 | 10:05 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डिजिटल सर्व्हिसेस टॅक्स’ (DST) बाबत अनेक देशांना डायरेक्ट इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा टॅरिफची धमकी दिली आहे. ज्या देशांकडून अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर हा कर लादला जाईल, त्या देशांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 100 टक्के (टॅरिफ) आकारलं जाऊ शकतं, असं ट्रम्प थेट म्हणाले. अशा करांमुळे विद्यमान व्यापार करारांना बाधा पोहोचेल, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.

अमेरिकन कंपन्यांवर ‘डिजिटल सेवा कर’ (digital services tax) लादणाऱ्या देशांना कठोर प्रतिशोधात्मक शुल्काचा (retaliatory tariffs) सामना करावा लागेल असा इशारा सोशल मीडियावरील एका पोस्टमधून ट्रम्प यांनी दिला. गरज पडली तर सध्याचे (विद्यमान) करार रद्द केले जातील, असंही ट्र्म्प यांनी ठणकावलं. ऑनलाइन जाहिराती, डिजिटल बाजारपेठा आणि वापरकर्त्यांचा डेटा यांतून महसूल मिळवणाऱ्या मोठ्या डिजिटल कंपन्यांच्या उत्पन्नावर हा डिजिटल सेवा कर आकारला जातो.

युरोपीय देशांचा युक्तिवाद काय ?

अनेक युरोपीय देशांनी असे कर लागू केले आहेत किंवा प्रस्तावित केले आहेत. बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्या ज्या ठिकाणी महसूल मिळवतात, त्या ठिकाणी जास्त कर भरावा असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र अमेरिकेने या उपायांना दीर्घकाळापासून विरोध दर्शवला आहे. डिजिटल सेवा कर विशेषतः गूगल, ॲपल, मेटा, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करतात असा त्यांचा युक्तिवाद आहे.

डिजिटल सर्व्हिस टॅक्स अद्याप अनिर्णित

या वर्षाच्या सुरुवातीला एका मोठ्या व्यापार कराराबाबत सहमती होऊनही, वॉशिंग्टन आणि युरोपीय सरकारे ‘डिजिटल करां’बाबत एकमत होऊ शकलेली नाहीत, अशा वेळी ट्रम्प यांचा हा इशारा आला आहे. ट्रान्स-अटलांटिक व्यापार संबंधांमधील डिजिटल सेवांवरील कर हा अजूनही न सुटलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहे. असा कर लागू करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर 100 % आयात शुल्काचा (टॅरिफचा) सामना करावा लागू शकतो; मग विद्यमान किंवा भविष्यातील कोणतेही व्यापार करार अस्तित्वात असले तरीही, असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं.

ब्रिटन आणि फ्रान्सलाही धमकी

ज्या देशांनी ‘डिजिटल सेवा कर’ (digital services tax) लागू केला आहे, त्यांच्याविरुद्ध व्यापारविषयक कारवाई करण्याची धमकी ट्रम्प यांनी वारंवार दिली. या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांवर २ टक्के डिजिटल कर लादल्यास ब्रिटनवर आयात शुल्क (टॅरिफ) लादलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच, फ्रान्सने आपला डिजिटल कर मागे न घेतल्यास त्यांच्या वाईनवर 100 टक्के आयात शुल्क लादले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली होती.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल