AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : हे युद्ध थांबवायचं असेल, तर ट्रम्प यांना हा सर्वात जोखमीचा, धोकादायक निर्णय लवकर घेण्याशिवाय पर्याय नाही

Donald Trump : आता युद्ध थांबवलं तर भविष्यात धोका कायम राहिलं. युद्धावर इतके अब्जावधी रुपये खर्च करण्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे इराणचा धोका कायमचा संपवायचाच याच इराद्याने अमेरिका-इस्रायल या युद्धात उतरले आहेत.

Donald Trump : हे युद्ध थांबवायचं असेल, तर ट्रम्प यांना हा सर्वात जोखमीचा, धोकादायक निर्णय लवकर घेण्याशिवाय पर्याय नाही
Donald Trump
| Updated on: Mar 21, 2026 | 12:13 PM
Share

इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लवकरच एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. अमेरिका-इस्रायलने सुरु केलेल्या या युद्धात जय-पराजयापेक्षा समोर ठेवलेली उद्दिष्टय जास्त महत्वाची आहेत. अमेरिका-इस्रायलने इराण विरुद्ध हे युद्ध सुरु करताना तीन मुख्य उद्दिष्टय होती. पहिलं म्हणजे इराणची अणू बॉम्ब बनवण्याची क्षमता संपूर्णपणे नष्ट करणं, दुसरं म्हणजे त्यांची बॅलेस्टिक मिसाईल उत्पादनाची क्षमता नष्ट करणं. कारण इराणच्या बॅलेस्टिक, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची रेंज दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि तिसरं म्हणजे इराणमध्ये सत्ता बदल. कारण आपल्या पसंतीचा सत्ताधारी तिथे असेल तर सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही. आज युद्धाला तीन आठवडे पूर्ण होत आहेत. या तीन उद्दिष्टयांपैकी एक तरी पूर्ण झालं का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे.

कारण या युद्धात अमेरिका-इस्रायलचा सर्वात मोठा अंदाज चुकला आहे. तो म्हणजे इराणी जनता हल्ले सुरु केल्यानंतर रस्त्यावर उतरून खामेनी प्रशासनाला सत्तेतून खाली खेचेल. इराणच्या जनतेने इस्रायल-अमेरिकेला सर्वात मोठा धोका दिला आहे. त्यामुळे अजूनपर्यंत तरी या युद्धाचा निकाल लागत नाहीय. उलट हे युद्ध अजून किती काळ लांबेल हे सांगता येत नाहीय. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, विएतनाम, अफगाणिस्तान सारखं हे युद्ध वर्षानुवर्ष चालणार नाही. पण आता युद्ध चालू झाल्यानंतर त्यातून माघारही घेता येत नाहीय अशी स्थिती आहे.

इराण अणूबॉम्ब बनवण्याची शक्यता

रेजीम चेंज म्हणजे सत्ता बदल हे जरी शक्य झालं नाही, तरी अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता आणि बॅलेस्टिक मिसाइल उत्पादनाची क्षमता मूळापासून नष्ट करणं हे अमेरिका-इस्रायलसाठी आवश्यक आहे. इराणने काही प्रमाणात युरेनियम संवर्धन केलं होतं. आता ते युरेनियम कुठे आहे? हा प्रश्न आहेच. त्याशिवाय इराण संवर्धन केलेल्या युरेनियमपासून पुन्हा अणूबॉम्ब बनवण्याची शक्यता आहे.

याचा कोणताही ठोस पुरावा नाही

अमेरिकेने इराणच्या अणू प्रकल्पांच्या ठिकाणांवर B-52 बॉम्बर विमानातून हजारो किलो वजनाचे बॉम्ब टाकले आहेत. पण यामध्ये ते युरेनियम नष्ट झालय का? याचा कोणताही ठोस पुरावा नाही. याआधी सुद्धा मागच्यावर्षी जून महिन्यात अमेरिकेने इराणच्या अणू प्रकल्पांच्या तळांवर असेच हल्ले केले होते. आता सुद्धा तशाच प्रकारची कारवाई केलीय.

लवकरच काही मोठ्या घडामोडी घडतील

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी युद्धातला सर्वात कठोर निर्णय म्हणजे स्पेशल फोर्सेसच मिशन. अमेरिकेला आपल्या एलिट कमांडो फोर्सला तिथे पाठवून इराणने समृ्द्ध केलेलं युरेनियम ताब्यात घ्यावं लागेल. इराणच्या भूमिवर अमेरिकन सैन्याला उतरवावं लागेल. हा ट्रम्प यांच्यासाठी एक कठोर निर्णय असेल. कारण मायदेशात आधीच त्यांना दबावाचा सामना करावा लागतोय. अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनाने आता या स्पेशल मिशनवर विचारमंथन सुरु केलं आहे. लवकरच काही मोठ्या घडामोडी घडतील. त्या शिवाय हे युद्ध थांबणार नाही.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक