AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP News: राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठा खुलासा! गोविंदबागेत दादांची बैठक, तारीखही ठरलेली

एकीकडे दोन्ही गटाकडून सध्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, असं सांगितलं जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. 

NCP News: राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठा खुलासा! गोविंदबागेत दादांची बैठक, तारीखही ठरलेली
NCP NewsImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 6:15 PM
Share

विक्रम वरे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी:

Yugendra Pawar On NCP Merjer:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत.  राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या बैठका यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे दोन्ही गटाकडून सध्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, असं सांगितलं जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे.

विलीकरण होणारचं होतं…’ 

“विलीनीकरण हे होणारच होतं. आज नाहीतर बऱ्याच महिन्यांपासून ही चर्चा आणि बातम्या आपण ऐकत आलो आहे. अजित दादांची याबाबत मिटींग झाली होती. येथे गोविंद बागेतसुद्धा दादांची मीटिंग झाली. तेव्हा तुम्ही सगळे पत्रकार पण होता. सगळ ठरलेलं, साधारण 12 फेब्रुवारीला दादांनीच ती घोषणा केली असती. अचानक दादा आपल्याला सोडून निघून गेले, त्यामुळे तो विषय मागे राहिला. विलीनीकरण होणार होतं ही दादांची इच्छा होती. पवार साहेबांसोबत पुन्हा एकदा एकत्र यायचं होते,”  असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

‘विमान अपघाताची चौकशी व्हावी..’

यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही महत्त्वाचे विधान केले. मी स्वतः विमान क्षेत्रातला तज्ञ नाही. पायलट नाही किंवा त्याचा अभ्यास मी केला नाही. चौकशी झालीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका राहिली आहे. दादा ज्यावेळी वारले होते त्याच वेळेस आम्ही बारामती पोलीस स्टेशन या ठिकाणी बसलो होतो. रोहित पवार पण या विषयावर अनेक दिवसांपासून बोलत आले आहेत. सगळ्यांची इच्छा आहे चौकशी झाली पाहिजे आणि ती लवकर झाली पाहिजे. अहवाल आहे तो सगळ्यांसमोर आला पाहिजे जाहीर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, “गोकुळ संदर्भात जे काही चाललं आहे ते चुकीचेच आहे. तिथे जी कोल्हापूरची लोक आहेत त्यांनी स्पष्ट बंटी पाटलांच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. तिथे जे नवीन संचालक नियुक्त करतात किंवा तो निर्णय घेतात हे चुकीचे आहे, लोकशाहीसाठी फार घातक आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरची जी स्वाभिमानी जनता आहे ती बंटी पाटलांसाठी रस्त्यावर उतरली आहे,” असं म्हणत युगेंद्र पवार यांनी गोकुळवरुनही आपली भूमिका स्पष्ट केली.

Follow Us
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?