AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबत चर्चा रद्द होताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, अधिकाऱ्यांना थेट आदेश… जगाची धाकधूक वाढली

US Iran Talk : इराणसोबतच्या चर्चेची दुसरी फेरी रद्द होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना एक मोठा आदेश दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणसोबत चर्चा रद्द होताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, अधिकाऱ्यांना थेट आदेश... जगाची धाकधूक वाढली
DJ Trump OrderImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 25, 2026 | 10:42 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील शांतता चर्चेची दुसरी फेरी रद्द झाली आहे. अमेरिकन शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच इराणी अधिकाऱ्यांनी इस्लामाबाद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. चर्चेची दुसरी फेरी रद्द होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, ’18 तासांचा प्रवास करण्यात आता काही अर्थ नाही. इराणला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी आम्हाला फोन करावा.’

अमेरिकन अधिकाऱ्यांचा पाकिस्तान दौरा रद्द

फॉक्स न्यूजच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी अमेरिकेचे वार्ताकार स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर आता इराणसोबत चर्चेसाठी पाकिस्तानला ज जाण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन प्रतिनिधीमंडळाने पाकिस्तानसाठी 18 तासांचा विमान प्रवास करण्याचा काहीच अर्थ नाही. इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेकडे सर्व निर्णायक पर्याय उपलब्ध आहेत. इराणी नेते कधीही अमेरिकेला फोन करू शकतात.

इराणी अधिकारी ओमानला रवाना

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे आपल्या अधिकाऱ्यांसह पाकिस्तानात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अराघची ओमानसाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर ते रशियालाही जाणार आहे. अशाप्रकारे विविध देशांच्या मदतीने इराण हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

अराघची यांनी ठेवल्या 10 अटी

पाकिस्तानमधून रवाना होण्यापूर्वी अराघची यांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी 10 अटी ठेवल्याचे सांगितले जात आहे. इराणने यापूर्वीच स्पष्ट केले होते की ते अमेरिकेसोबत थेट चर्चा करणार नाहीत. धमक्या आणि दबावाच्या वातावरणात अमेरिकेसोबत थेट चर्चा शक्य नाही असं इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलं होते. त्यामुळे आता ही चर्चा पाकिस्तानच्या माध्यमातून होणार आहे. तसेच अराघची यांनी आधीच सांगितले होते की, मी पाकिस्तान, नंतर ओमान आणि नंतर रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय मुद्द्यांवर समन्वय साधणे असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल