Gaza New Map : असं झालं तर खरच इस्रायल-गाझा प्रश्न कायमचाच मिटेल, ट्रम्प यांनी जारी केलेला नकाशात काय आहे?
Gaza New Map : "मला अपेक्षा आहे की, आम्हाला एक सकारात्मक उत्तर मिळेल. पण असं झालं नाही, तर तुम्हाला माहितीय बीबी म्हणजे इस्रायली पंतप्रधान तुम्हाला जे करायचं असेल, त्याला आमचं पूर्ण समर्थन असेल"

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध संपवण्यासाठी नवीन प्लान तयार केला आहे. त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये हा प्लान जारी केला. ट्रम्प म्हणाले की, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुद्धा या प्लानशी सहमत आहेत. सोबतच ट्रम्प यांनी गाझाचा नवीन नकाशा तयार केला आहे. या नकाशानुसार, गाझा आणि इस्रायलमध्ये कायमस्वरुपी एक बफर झोन राहीलं. या रेषेपलीकडे ना इस्रायली सैनिक जाणार, ना पॅलेस्टाइनचे लोक येणार.
“हमासने हा प्रस्ताव मान्य केला, तर उर्वरित बंधकांची तात्काळ सुटका करण्याची त्यात तरतुद आहे. या तरतुदी अंतर्गत हमासला सर्व जिवंत आणि मृत बंधकांची लगेच सुटका करावी लागेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.राष्ट्रपती ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नकाशात तीन लाइन्स आहेत. निळी, पिवळी आणि लाल. त्यानंतर बफर झोन आहे. निळी रेषा आहे, तिथे इस्रायली सुरक्षा यंत्रणांच नियंत्रण आहे. ही रेषा खान युनूस जवळ आहे.
बफर झोन
त्यानंतर राफावरुन पिवळी रेषा जाते. याला फर्स्ट विदड्रॉअल लाइन म्हटलय. पिवळ्या रेषेचा अर्थ आहे की, बंधकांना सोडण्यासह इस्रायली सैन्य पिवळ्या रेषेपर्यंत येईल. यानंतर सेकेंड विदड्रॉअल लाइन आहे. ही लाल रेषा आहे. सेकेंड विदड्राअल नंतर इस्रायली सैन्य इथे येऊन थांबेल. त्यानंतर बफर झोन सुरु होतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिलाय?
“शांततेसाठी हा करार होईल अशी मला अपेक्षा आहे. अन्य सर्वांनी हा करार मान्य केला आहे. मला अपेक्षा आहे की, आम्हाला एक सकारात्मक उत्तर मिळेल. पण असं झालं नाही, तर तुम्हाला माहितीय बीबी म्हणजे इस्रायली पंतप्रधान तुम्हाला जे करायचं असेल, त्याला आमचं पूर्ण समर्थन असेल” असं इशारा अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. “गाझामधील लोकांच्या लाभासाठी पुनर्विकास केला जाईल. दोन्ही बाजू या प्रस्तावावर सहमत झाल्या, तर युद्ध तात्काळ संपेल” असं या प्लानमध्ये म्हटलं आहे.
इस्रायल बदल्यात काय करणार?
हमासने सर्व बंधकांची सुटका केल्यानंतर इस्रायल सुद्धा 250 आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची सुटका करेल. सोबतच 7 ऑक्टोंबर 2023 नंतर ताब्यात घेतलेल्या 1700 गाजावासियांची सुद्धा सटका करणार आहे. इस्रायल सुटका केलेल्या प्रत्येक इस्रायली बंधकाच्या बदल्यात 15 मृत गाजावासियाचे अवशेष सुद्धा पॅलेस्टाइला देईल.
