AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प सरकारचा व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, …तर अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही

डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून चर्चेत असतानाच त्यांनी आता अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. सतत ते व्हिसाबाबत नियम बदलताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट याबद्दलचा आदेशच काढला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प सरकारचा व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, ...तर अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही
Donald Trump
| Updated on: Sep 05, 2025 | 8:24 AM
Share

टॅरिफच्या वादातून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर दोन्ही देशांमधील संवाद हा जवळपास संपला आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेतून भारताला धमकावले जात आहे. मुळात म्हणजे भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, अशी अमेरिकेची प्रमुख अट आहे. जर भारताने ही अट मान्य केली नाही तर टॅरिफ वाढवला जाईल. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम भारतातील काही उद्योगांवर झालाय. भारत हा यामुळे मार्ग काढत आहे. यादरम्यानच्या काळात भारत आणि चीनमधील जवळीकता वाढली आहे. दोन्ही देशांनी महत्वाचे करार केले. भारत, रशिया आणि चीन एकचा मंचावर आले.

आता अमेरिकेकडून याच पार्श्वभूमीवर मोठा धक्का देण्याचे काम करण्यात आले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी घोषणा केले की, काही मध्य अमेरिकन नागरिकांवर नवीन व्हिसा निर्बंध लादले जात आहेत, याचे कारण हे चीन आहे. परराष्ट्र विभागाने निवेदन जारी केले. जे या नियमांचे पालन करतात, त्यांच्या कुटुंबियांसह, त्यांना आता अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे थेट म्हणण्यात आलंय. थोडक्यात काय तर आता चीनचा सपोर्ट करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाहीये.

अमेरिकेतील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी आणि कायदा कमकुवत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. आता अशा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल, असे सांगण्यात आलंय. रुबियो यांनी म्हटले की, हा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आम्हाला शक्य ते सर्व पाऊले आम्ही उचलू.

तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार, हे धोरण मध्य अमेरिकेत चीनच्या वाढत्या उपस्थितीबद्दल आहे. चीनमुळे सरकार चिंतेत आहे. आता थेट मोठे कडक पाऊल हे उचलण्यात आलंय. दुसरीकडे टॅरिफच्या मुद्द्यावर चीनने अमेरिकेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनवर सध्याच अमेरिकेने टॅरिफ लावला नाहीये. मात्र, 90 दिवसांच्या कालावधीनंतर तो लावला जाईल, त्यापूर्वीच चीन हे अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात मैदानात उतरला आहे.

Follow Us
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड