AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठी बातमी, टॅरिफच्या जाचातून सुटका, डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, फक्त 15 टक्केच…

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावून तेथील अर्थव्यवस्थेला अत्यंत मोठा धक्का दिला. अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात अनेक देश हे एकवटतांना दिसले. सततच्या विरोधानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचे बघायला मिळतंय.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठी बातमी, टॅरिफच्या जाचातून सुटका, डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, फक्त 15 टक्केच...
Donald Trump Tariffs
| Updated on: Sep 05, 2025 | 7:32 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. ट्रम्प सरकारने टॅरिफबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जगभरातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध होताना दिसतोय. फक्त विरोधच नाही तर टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेला एकटे पाडण्याचे काम सुरू असून अनेक देश हे अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरली आहेत. भारताला टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेकडून ज्याप्रकारच्या धमक्या सध्या दिल्या जात आहेत, त्यावर जाहिरपणे भाष्य पुतिन यांनी केले आणि जगातील महाशक्ती देशाला तुम्ही अशी भाषा वापरू शकत नाहीत, असे स्पष्ट केले. चीनकडूनही अमेरिकेला विरोध होतोय.

टॅरिफच्या सततच्या विरोधानंतर आता अमेरिकेने थेट पाऊले उचलली असून डोनाल्ड ट्रम्प हे तोंडावर पडल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानवर 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर जपानमध्ये या टॅरिफबद्दल रोष बघायला मिळाला. हेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट जपानच्या दाैऱ्यावर गेले आणि त्यांनी काही महत्वाचे करार देखील तिथे केले.

आता अमेरिका आणि जपान व्यापार करारावर मोठा मार्ग हा अमेरिकेकडून काढण्यात आलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जपान नव्या व्यापार करारावर सही केलीये. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच जपानवर 25 टक्के टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जपानकडून विरोध करण्यात आला आणि त्याचा परिणाम हा थेट दोन्ही देशांच्या व्यापारावर झाला. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडले असून त्यांनी जपानवरील 25 टक्के टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा अमेरिकेला मोठा पराभव म्हणाला लागेल. आता जपानवर फक्त 15 टक्के टॅरिफ हा असणार आहे.

अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात जपान देखील बोलताना दिसला. आता टॅरिफवरून मोठा झटका डोनाल्ड ट्रम्प यांना बसल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, जपानवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरीही अजूनही भारत आणि ब्राझीलवर टॅरिफचे संकट कायम आहे. चीनने देखील या टॅरिफला विरोध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एखाद्या हत्यारासारखे वापरत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.