AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या कारमध्ये 45 मिनिट काय घडले? मोठा खुलासा, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले..

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प हे भारताला टार्गेट करताना दिसत आहेत. फक्त टार्गेटच नाही तर थेट धमकावले देखील जात आहे. अनेक वर्षांचे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध टॅरिफच्या मुद्द्यावर ताणले गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या कारमध्ये 45 मिनिट काय घडले? मोठा खुलासा, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले..
Vladimir Putin and Narendra Modi
| Updated on: Sep 04, 2025 | 1:07 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनमधील संमेलनात भेट झाली. फक्त भेटच नाही तर नरेंद्र मोदी आणि पुतिन या दोघांनी एकाच कारमधून प्रवास केला. चीनमध्ये बैठकीला निघाल्यावर पुतिन आणि नरेंद्र मोदी एकाच कारमध्ये बसले. यादरम्यान ते 45 मिनिट फक्त दोघेच होते. नरेंद्र मोदी यांची काही वेळ वाट पाहत पुतिन थांबले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्यासोबतच्या कार प्रवासाचा फोटो हा थेट सोशल मीडियावर शेअर केला. आता यादरम्यानच्या प्रवासामध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावर थेट पुतिन यांनी खुलासा केलाय.

व्लादिमीर पुतिन यांना पत्रकारांनी विचारले की, नरेंद्र मोदी आणि तुम्ही दोघे एकाच कारमध्ये प्रवास करताना दिसले. तुमच्या दोघांमध्ये 45 मिनिट काय चर्चा झाली? यावर पुतिन यांनी म्हटले की, हे काही फार गुप्त नाही. ज्यावेळी आम्ही दोघे गाडीमध्ये होतो, त्यावेळी मी त्यांना अलास्कामधील बैठकीत काय झाले, यावर बोललो आणि आम्ही दोघांनी त्यावरच चर्चा केली. पुतिन हे या 45 मिनिटांमध्ये दोघांमध्ये काय संवाद झाला हे सांगताना दिसले आहेत.

पुतिन यांनी अलास्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती, त्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर पुतिन यांनी लगेचच नरेंद्र मोदी यांना देखील त्यावेळी फोन केला होता. यावेळी त्यांनी बैठकीत काय झाले हे सांगितले होते. युक्रेन युद्धाबाबत पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प हे जगाला दाखवत आहेत.

अमेरिकेकडून भारताला धमकावले जात असताना पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट शिष्टाचार शिकवला आहे. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणे पूर्णपणे बंद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना तब्बल चार फोन केले. मात्र, एकाही फोनचे उत्तर हे नरेंद्र मोदी यांनी दिली नाही. अनेक वर्षांचे चांगले संबंध भारत आणि अमेरिकेतील सध्या ताणले गेले आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा