तुम्ही दुसरी नोकरी शोधा…भारताला डोनाल्ड ट्रम्प देणार दुसरा सर्वात मोठा धक्का, म्हणाले, आठवड्यापूर्वीच मी..
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प हे नाराज आहेत. फक्त नाराजच नाही तर त्यांनी त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, फक्त टॅरिफच नाही तर भारतावर अजूनही कारवाई होणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल वेगवेगळे दावे करताना दिसतात. रशियाकडून तेल खरेदी भारताने सुरूच ठेवलीये. अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. मात्र, अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. आता नुकताच रशियाच्या तेल खरेदीच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प हे भडकताना दिसले. त्यांनी परत एकदा भारताला धमकी दिली आहे.पोलॅंडचे राष्टपती करोल नवरोकी यांच्यासोबत व्दिपक्षीय बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मोठे खुलासे केले. पोलॅंडच्या पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट म्हटले की, तुम्ही पुतिन यांच्याबद्दल नाराजी जाहीर केली. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली?
.या प्रश्नानंतर डोनाल्ड ट्रम्प हे संतापल्याचे बघायला मिळाले. त्यांनी थेट म्हटले की, तुम्हाला कसे समजले की, मी कोणतीही कारवाई केली नाही? तुम्ही म्हणाल रशियाकडून तेल खरेदी करणारा चीन हा सर्वात मोठा देश आहे मग भारतावर कारवाई बरोबर आहे? पण मी तुम्हाला सांगतो की, शेकडो अरब डॉलरचे नुकसान झाले आहे. तरीही तुम्ही म्हणणार कोणतीही कारवाई नाही? विशेष म्हणजे मी अजून दुसरा आणि तिसरा टप्प लागू केला नाहीये.
पण जर तुम्हाला इतके मोठे नुकसान होऊनही दिसत नसेल तर मला वाटते की, तुम्ही नक्कीच दुसरी नोकरी शोधायला पाहिजे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट म्हटलो होतो की, भारत जर रशियाकडून तेल खरेदी करेल तर त्याला खूप जास्त मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे नक्कीच मला याबद्दल विचारू नका, असे स्पष्ट सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अजूनही मी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कारवाई करू शकतो. यासोबतच अमेरिकेच्या टॅरिफनंतर रशियाचे मोठे नुकसान होत असल्याचे पुढे आलंय. मात्र, भारताने अमेरिकेच्या धमकीनंतरही रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही. आता भारतावर डोनाल्ड ट्रम्प हे पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
