AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोठे झटके, जगाचे टॅरिफचे संकट टळणार? घडामोडींना वेग, बेकायदेशीर…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात फक्त भारतच नाही तर अमेरिकेतही संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामध्येच दोन निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोठे झटके, जगाचे टॅरिफचे संकट टळणार? घडामोडींना वेग, बेकायदेशीर...
Donald Trump
| Updated on: Sep 03, 2025 | 10:37 AM
Share

भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगोदरच चर्चेत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय.  न्यायालयांनी दोन मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचे बेकायदेशीर घोषित केले आहेत. सध्या अमेरिकेत लोक हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परत जा…परत जा..अशा घोषणा या त्यांच्याविरोधात करत आहेत. त्यामध्येच आता थेट कोर्टाने त्यांच्या निर्णयाला बेकायदेशीर म्हटले.

कोर्टाने दिलेला पहिला निर्णय हा कॅलिफोर्नियातील लष्करी तैनातीशी संबंधित आहे. ज्याला फेडरल न्यायाधीश चार्ल्स ब्रेयर यांनी बेकायदेशीर घोषित म्हटले. त्यांनी पोसी कमिटॅटस कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले. दुसरा निर्णय आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले. फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ हा बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाला कोर्टाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

शिवाय कोर्टाने अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, टॅरिफ हा फक्त ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासारख्या अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. अमेरिकेतही अनेक गोष्टींवर टॅरिफ लावल्याने महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातून अमेरिकेत होणारी मोठी निर्णयात बंद झालीये. नफा कमी मिळत असल्याने अनेक भारतीय वस्तू या अमेरिकेच्या मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत. भारताने अमेरिकेत जाणारी टपाल सेवा देखील बंद केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध होताना दिसतोय. जर खरोखरच ऑक्टोबर महिन्यात टॅरिफ बंद झाला तर जगाला मोठा दिलासा मिळेल. डोनाल्ड ट्रम्प हे हुकूमशाहप्रमाणे वागताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल फक्त भारतीयच नाही तर अमेरिकन लोकांमध्येही संताप बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच त्यांचा नियोजित भारत दाैरा देखील रद्द केलाय.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा