मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, थेट धमकी, म्हणाले, आमचे लष्कर…
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार भारताच्या विरोधात विधाने करताना दिसत आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध मागील काही दिवसांपासून चांगलेच ताणल्याचे सध्या बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू असल्याचे सध्या बघायला मिळतंय. भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसले आहेत. मात्र, त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटले की, मी रशिया आणि चीन यांची वाढलेली मैत्री पाहून अजिबातच चिंतेत नाही. मात्र, त्यांच्या वागण्यावरून आणि चेहऱ्यावरील हावभावावरून हे स्पष्ट होतंय की, भारत, चीन आणि रशिया एकत्र आल्याने त्यांना किती मोठा धक्का बसला आहे.
मुळात म्हणजे अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे चीन, रशिया आणि भारत एकत्र आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया अमेरिकेच्या विरोधात कधीच सैन्याचा उपयोग करणार नाही. यावेळी त्यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलही मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी अजिबातच तणावात नाहीये. आमच्याजवळ जगातील सर्वात शक्तीवान सेना आहे. अमेरिकेला चीनची गरज आहे हे नक्की आहे पण अमेरिकेपेक्षा कितीतरी जास्त पट चीनला अमेरिकेची गरज आहे.
अलास्कामध्ये झालेल्या बैठकीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी पुतिन यांच्यावर खूप जास्त नाराज आहे. आमच्या दोघांमध्ये चांगले संबंध होते. युक्रेन शांतीसंदर्भातील आमची बैठक देखील चांगली आहे. पण आता मी खूप जास्त त्यांच्यावर निराश आहे. युक्रेन युद्धाबाबत रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्या नाहीत. भारत, चीन आणि रशिया एकच येत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची पोटदुखी उठली आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेतही त्यांच्या विरोधात लोकांचा रोष हा बघायला मिळतोय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरताना देखील दिसत आहेत. भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात आता खूप कमी झाली. मोठ्या टॅरिफमुळे व्यावसायिकांना मिळणारा नफा हा खूपच कमी झाला आहे. यावर भारताकडून उपायोजना सुरू आहेत. मात्र, काहीही झाले तरीही भारत हा अमेरिकेच्या अटी मान्य करणार नसल्याचे भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे.
