डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला पुन्हा मोठी चेतावणी, समस्यांमध्ये वाढ, म्हणाले, टॅरिफमध्ये…
भारत आणि अमेरिकेतील वाद टोकाला गेलाय. त्यामध्येच आता परत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावले आहे आणि टॅरिफमध्ये किती जास्त ताकद आहे हे सांगितले आहे. भारत आणि अमेरिकेमधील संबंध या टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणल्याचे बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. फक्त टॅरिफच नाही तर भारताबद्दल धक्कादायक दावे करताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेत भारताबद्दल पुन्हा मोठा दावा केलाय. त्यांनी म्हटले की, तानाशाह नाही तर खूप जास्त समझूतदार व्यक्ती मी आहे. त्यांनी म्हटले की, मी भारत आणि पाकिस्तानमधील परमाणू युद्ध थांबवले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध पुढच्या टप्प्यात गेले होते.
सात जेट विमान पाडण्यात आली होती. हे युद्ध थांबवण्यासाठी माझ्याकडे अवघे काही तासच शिल्लक होती आणि मी ते युद्ध रोकले. पुढे मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी टॅरिफच्या माध्यमातून हे युद्ध रोखले आहे. मुळात म्हणजे टॅरिफची ताकद कोणालाही अजून माहिती नाही, हळूहळू ती सर्वांना कळेल. त्यांनी ही धमकी भारताला दिलीये. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, युक्रेनवर युद्धासाठी अमेरिकेने कोणताही पैसा खर्च केला नाहीये. युक्रेन मागत असलेल्या सुरक्षा हमीबाबत बोलणे डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात मोठ्या मुद्द्यावर भाष्य केले आणि म्हटले की, टॅरिफच्या माध्यमातून मी ते युद्ध रोखले. हेच नाही तर टॅरिफमध्ये मोठी ताकद असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती स्पष्ट होताना दिसतंय. टॅरिफच्या हत्यार बनवण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांन केले आहे. हेच नाही तर त्यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफच्या निर्णयावर सह्या देखील केल्या आहेत. हा भारताला अत्यंत मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर टॅरिफ लावल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय. मात्र, स्वत: अमेरिका देखील रशियाकडून कच्चे तेल खरेदी करते. अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले आहे. भारत देखील आता अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या आठवड्यात जपानच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. तिथे काही ते महत्वाचे करार करू शकतात.
