
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून असे काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत की, सर्व जग हादरलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारले असून अनेक लोकांना अमेरिकेतून बाहेर काढलंय. यामुळे लाखोंच्या घरात लोकांवर बेरोजगारीची वेळ आलीये. अमेरिकेत स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील स्थलांतरितांच्या 50 वर्षात पहिल्यांदा इतकी मोठी 50 टक्क्यांची घट झाली आहे. तशी आकडेवारीही थेट पुढे आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने 50 टक्क्यांनी झाली घट
रिसर्च सेंटरच्या मते, जानेवारी 2025 मध्ये 53.3 टक्क्यांपेक्षाही जास्त ही संख्या आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाने लादलेले कडक नियम हे महत्वाचे कारण आहे. मोठ्या प्रमाणात हद्दपारी आणि व्हिसा आणि आश्रय धोरणांमध्ये बदल यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, जवळजवळ 1.6 दशलक्ष स्थलांतरितांनी देश सोडला. हा आकडा अत्यंत मोठा नक्कीच म्हणावा लागेल. 14 लाख लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
धक्कादायक आकडेवारी आली पुढे
यापैकी काही लोकांनी स्वत:च्या इच्छेने देश सोडला आहे तर काहींना बाहेर काढण्यात आलंय. एप्रिल ते जून या कालावधीत, ICE ने 3,59,000 हून अधिक लोकांना अटक केली आणि 3,32,000 लोकांना हद्दपार केले आहे. याशिवाय, सर्व व्हिसा धारकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल आणि जर कोणत्याही अटीचे उल्लंघन आढळले तर व्हिसा रद्द केला जाईल, असे सांगितले आहे.
अनेकांचे थेट करण्यात आली व्हिसा रद्द
ग्रीन कार्डमध्येही काही गोष्टी आढळल्या तर थेट व्हिसा हा रद्द करण्यात आला आहे. काही आर्थिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या धोरणामुळे शेतीसारख्या क्षेत्रात कामगारांची कमतरता निर्माण होत आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. कॅलिफोर्नियामध्ये आयसीईच्या अहवालानुसार, 20 ते 40 टक्के कृषी कामगारांचे नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प जास्तीत जास्त विदेशी लोकांना आपल्या देशातून बाहेर काढताना दिसत आहे. हेच नाही तर एका अपघातानंतर नवीन चालक व्हिसा देणे सुद्धा त्यांनी बंद करण्याचा धक्कादायक असा निर्णय घेतला आहे.