जगाला अंधारात ठेवत डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या कंपनीसोबत मोठा करार, हातावर तुरी देत अमेरिकेने…
America Donald Trump : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण जगाला वेठीस धरताना दिसत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा करार केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतली, याचा भरोस जगाला राहिला नाही. कधी टॅरिफ तर कधी धमक्या देण्याचे काम सध्या ट्रम्प करत आहेत. ब्राझीलने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आता आमचा आणि अमेरिकेचा काहीच संबंध राहिला नाही. ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एखाद्या हत्याराप्रमाणे वापरत असल्याचा आरोप आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या फार्मा वस्तूंवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर त्याच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. अमेरिकेतूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध होत आहे.
मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांची नजर होती ती म्हणजे चीनच्या टिकटॉकवर. आता अमेरिकेत टिकटॉक चालवण्याच्या कराराला मंजुरी देण्यात आलीये. व्हाईट हाऊसमध्ये या करारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली. यादरम्यान बोलताना त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. आम्ही चर्चेनंतर शेवटी या कराराला मान्यता दिली. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली.
अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार, आता टिकटॉकचे अमेरिकन अॅप एका नवीन अमेरिकन कंपनीद्वारे चालवले जाईल. ही कंपनी अमेरिकन लोकांच्या नियंत्रणाखाली असेल. कोणत्याही परदेशी शत्रू देशाद्वारे ती नियंत्रित केली जाणार नाही. नवीन कंपनीमध्ये ओरेकल सिल्व्हर लेक आणि इतर अनेक अमेरिकन गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशात काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
टिकटॉकची चीनची मूळ कंपनी बाईटडान्स आहे. मात्र, आता अमेरिकेत 20 टक्क्यांपेक्षाही कमी हिस्सा या मूळ टिकटॉक कंपनीचा असणार आहे. अमेरिकेने मूळ टिकटॉक कंपनीच्या हातावर तुरी नवीन करारात दिल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. फक्त अमेरिकाच नाही तर भारतासह अनेक देशांनी टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता मोठा करार अमेरिकेने केला असून अमेरिकेतील टिकटॉकवरील बंद ही उठवली जाणार आहे.
