AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली! देशावर नवं संकट, थेट अमेरिकन तरुण निशाण्यावर; मोठा फटका बसणार

Donald Trump in Tension : अमेरिकेने व्हेनेझुएलासारख्या देशांमध्ये लष्करी कारवाया करून ड्रग्स तस्करांचे कंबरडे मोडले आहे. मात्र तरीही अमेरिकेवरील संकट टळलेले नाही. एका नवीन संकटामुळे ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली! देशावर नवं संकट, थेट अमेरिकन तरुण निशाण्यावर; मोठा फटका बसणार
Trupm Pink cocaineImage Credit source: Google
| Updated on: Jan 11, 2026 | 4:28 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात निर्णयाचा धडाका लावला आहे. ते खासकरून ड्रग्ज तस्करीवर कडक कारवाई करत आहेत. त्यांनी कॅरिबियनमध्ये ड्रग्ज बोटींवर अनेक हल्ले केले आहेत. तसेच व्हेनेझुएलासारख्या देशांमध्ये लष्करी कारवाया करून ड्रग्स तस्करांचे कंबरडे मोडले आहे. मात्र तरीही अमेरिकेवरील संकट टळलेले नाही. एक नवीन औषध गुलाबी कोकेन (तुसी), अमेरिकेतील क्लब आणि पार्ट्यांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. अ‍ॅक्सिओसच्या अहवालांनुसार, हे कोकेन आता मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागात पसरले आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुलाबी कोकेन म्हणजे नेमके काय?

गुलाबी कोकेन हे प्रत्यक्षात कोकेन नाही, तर ते अनेक औषधांपासून तयार करण्यात आलेले एक धोकादायक कॉकटेल आहे. यात केटामाइन (एक विघटनकारी) आणि एमडीएमए (एक्स्टसी) असते. तसेच यात अनेकदा मेथाम्फेटामाइन, ओपिओइड्स आणि फेंटॅनिल सारखे संभाव्य धोकादायक पदार्थ देखील आढळलेले आहे. हे मिश्रण आकर्षक दिसण्यासाठी यात गुलाबी रंग मिळवला जातो. हे कोकेन प्राणघातक देखील असू शकते. याचे सेवन अति प्रमाणात केल्यामुळे श्वसनक्रिया बंद पडणे, हृदय फेल होणे आणि सायनोसिस होऊ शकतो, कारण यामुळे शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

ते औषध नसून एक विष आहे

गेल्या काही काही महिन्यांमध्ये लॉस एंजेलिस, मियामी, न्यू यॉर्क आणि कोलोरॅडो स्प्रिंग्जसह अनेक प्रमुख अमेरिकन शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली असून गुलाबी कोकेन जप्त करण्यात आले आङे. 2025 मध्ये, न्यू यॉर्कमधील एका कारवाईत गुलाबी कोकेनसह डझनभर शस्त्रे जप्त करण्यात आली होती. सप्टेंबर 2020 ते जुलै 2024 पर्यंत कोकेनशी संबंधित घटनांमध्ये अनकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच 224 च्या सुरुवातीपासून 4 राज्यांमध्ये 18 लोकांना यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुलाबी कोकेन कुठं तयार होते?

गुलाबी कोकेनचा उगम कोलंबियामध्ये झाल्याचे मानले जाते. सुरुवातील ते क्लब आणि पार्टी ड्रग म्हणून पुढे आले होते. याचे सादर केले गेले. त्याला तुसी असे नाव देण्यात आले. 2C (सायकेडेलिक ड्रग) पासून प्रेरित होऊन हे तयार करण्यात आले आहे. हळूहळू ते लॅटिन अमेरिकेतून युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये पसरले. गुलाबी कोकेनमुळे एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्यावर कोणताही थेट उपचार नाही. त्यामुळे याच्या सेवनामुळे जीवही जाण्याचा धोका आहे. त्यामुळे वेळीच यावर नियंत्रण न मिळवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.