अमेरिकेत खतरनाक बैठक पार, कोणत्याही क्षणी करू शकते अमेरिका या देशावर थेट हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट लष्करी..
इराणमधील आंदोलन चिघळताना दिसत आहे. अमेरिकेसह संपूर्ण जग या आंदोलनावर बारीक लक्ष ठेऊन आहे. शिवाय इराण सरकारनेही थेट मोठा इशारा अमेरिकेला दिला असून इंटरनेट पूर्णपणे बंद केले आहे.

इराणमध्ये लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर सरकारकडून गोळीबार करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनात उडी घेतली आणि थेट इराणने आंदोलकांवर अत्याचार केला तर आम्ही त्यांना प्रचंड यातना देऊ असे थेट अमेरिकेने म्हटल्याने खळबळ उडाली. इराणने म्हटले की, आमच्या देशाच्या सुरक्षेमध्ये कोणीही ढवळाढवळ केली तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही हात कापू… अमेरिका इराणच्या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करत असल्याने हे आंदोलन अधिक भडकताना दिसत आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेप अजिबातच सहन करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात इराणने म्हटल्यानंतरही अमेरिका यावर भाष्य करताना दिसत आहे. हेच नाही तर अमेरिका कधीही हल्ला करू शकते, असेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करी पर्यायांबद्दल माहिती देण्यात आली.
यासोबतच इराणने मोठे विधान करत म्हटले की, काही लोक मुद्द्याम आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणमध्ये सध्या पूर्णपणे इंटरनेट सेवा बंद आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत म्हटले की, आमचे बारीक लक्ष या आंदोलनावर आहे, जर गोळ्या चालवल्या तर खूप जास्त त्रास आम्ही तुम्हाला देऊ.
इराणमध्ये आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत असून महागाईच्या विरोधातील आंदोलन चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर एक बैठक अमेरिकेत झाली. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करी पर्यायांबद्दल सर्व माहिती देण्यात आली. इराणवर अमेरिका हल्ला करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत असून काही निर्णय झाला नाहीये. अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने यावर बोलताना म्हटले की, इराणमध्ये इंटरनेट बंद आहे. आंदोलकांवर गोळीबार आणि अटक केल्याची माहिती मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराण यापूर्वी कधी आजादीकडे बघत नव्हता… अमेरिका मदतीसाठी तयार आहे. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, इराणी लोकांचा मोठा संघर्ष लवकरच संपेल… आंदोलनकर्ते जिंकण्याच्या अगदी जवळ आहेत. 10 जानेवारी रोजी 15 राज्यात 60 आंदोलने झाली. हे मोठे आंदोलन आहे. अमेरिका कधीही इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. काही बैठकाही झाल्याची माहिती मिळतंय.
