AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! भारताच्या या वस्तूंवर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा तयारीत डोनाल्ड ट्रम्प, धक्कादायक माहिती पुढे…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने जगात खळबळ असतानाच आता अजून एक मोठा धक्का भारताला देण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. काही रिपोर्टमध्ये याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

जग हादरलं! भारताच्या या वस्तूंवर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा तयारीत डोनाल्ड ट्रम्प, धक्कादायक माहिती पुढे...
Donald Trump
| Updated on: Sep 02, 2025 | 12:12 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय करतील याचा अजिबातच नेम नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेता आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्र आहेत असे सांगून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर हा टॅरिफ लावला आहे. यामुळे अनेक व्यवसायांना मोठा फटका बसलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारतातून येणाऱ्या औषधांवर अजून 50 टक्के टॅरिफ लावला नाही. यामुळे अनेक कंपन्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, गोळ्या आणि औषधांवर सध्याच टॅरिफ न लावण्याचे कारण आता पुढे आलंय.

गोळ्या आणि औषधांवर डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल 200 टक्के टॅरिफ लावायचा हे. गोळ्या आणि औषधांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यामागे त्यांची मोठी योजना आहे. रिपोर्टनुसार, जगातील जेनेरिक औषधांचा प्रमुख निर्यातदार असलेला भारत विशेषतः या परिस्थितीमध्ये असुरक्षित आहे. जर अमेरिकेने 200 टक्के टॅरिफ औषधांवर लावला तर भारतीय औषध उत्पादकांना थेट मोठा तोटा होऊ शकतो आणि याचा परिणाम निर्यातीवर होईल.

काही अहवालात असे सांगण्यात आले की, ट्रम्प प्रशासन चीनमधून आयात केलेली औषधे आणि त्यांच्या कच्च्या मालावर एपीआयवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे याचा फटका थेट भारताला बसू शकतो. जर भारतीय औषधांवर 200 टक्के टॅरिफ लागू केले तर निर्यात कमी होणार. कारण मिळणारा नफा हा फारच कमी असणार आहे. 200 टक्के टॅरिफ भारतीय औषधांवर लावले म्हणजे हा मोठा अन्याय असणार आहे. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे, याकरिता भारतावर दबाव टाकण्याचे काम हे सध्या सुरू आहे.

भारताला सतत अमेरिकेडून धमकावले जात आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेला मोठी पोटदुखी उठली आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी तपान दाैऱ्यानंतर लगेचच चीन दाैरा केला, यावेळी ते पुतिन यांच्यासोबत एकाच गाडीमध्ये बसून बैठकीला रवाने झाले.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.