Donald Trump : सर्वांसमोर महिलेला केलं किस, डोनाल्ड ट्रम्प यांचा कारनामा, व्हिडीओ समोर येताच खळबळ!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात लोकांसमोरच महिलेला किस केलं आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Donald Trump Kissing Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगातील प्रमुख नेत्यांमधील सर्वात महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी एखादा निर्णय घेतला की त्याचा परिणाम संपूर्ण जगावर पडतो. परंतु ट्रम्प अमेरिकेसारख्या मोठ्या देशाचे प्रमुख असले तरी ते वेगवेगळ्या कारणामुळे वादात सापडलेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या काही पोस्ट तसेच त्यांनी जाहीर सभेत केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर जगभरात टीका करण्यात आलेली आहे. दरम्यान, आता याच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अजब कृत्य केले आहे. त्यांनी शेकडो लोकांसमोर एरिका किर्क यांना किस केलं आहे. ट्रम्प यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
नेमकं काय घडलं आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी कंझव्हेटिव्ह विचारसरणीचे दिवंगत नेते चार्ली किर्क यांची विधवा पत्नी एरिका किर्क यांना किस केलं आहे. ओव्हल येथील कार्यालयात ट्रम्प यांनी शेकडो लोकांसमोर हे कृत्य केले आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारोहादरम्यान सोमवारी (10 नोव्हेंबर ) हा प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी एरिका यांना बोलवलं. त्यांची चौकशी केली आणि शेवटी एरिका यांच्या गालावर किस केलं.
कोण आहेत एरिका किर्क?
ट्रम्प यांनी केलेला हा प्रकार अनेकांना आवडलेला नाही. त्यांच्या कृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकजण त्यांच्यावर टीका करत आहेत. ट्रम्प यांची ही कृती योग्य नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. एरिका किर्क यांचे पती चार्ली किर्क हे ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या संस्थचे संस्थापक होते. नुकतेच त्यांची गोळी घालून भर दिवसा हत्या करण्यात आली. एरिका किर्क या संस्थेच्या संस्थापक आहेत. त्या सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारोहात उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात ट्रम्प यांनी एरिका यांना मंचावर बोलावले आणि गालावर किस केले.
Why is Erika Kirk attending the swearing in ceremony for US Ambassador to India? pic.twitter.com/FgDFtEI23D
— Maine (@TheMaineWonk) November 10, 2025
ट्रम्प यांचे केले जातेय समर्थन
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थही बोलत आहेत. ट्रम्प यांनी ही कृती फक्त प्रेम, काळजी आणि आदरापोटी केली, असे काही नेटकरी म्हणत आहेत. तर दुसरीकडे #PredatorInChief हा हॅशटॅग वापरून ट्रम्प यांच्याविरोधात मतं व्यक्त केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
