AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Presidential Election | सर्व्हेमध्ये पिछाडीवर असणारे डोनाल्ड ट्रम्प ‘या’ गोष्टीत आघाडीवर

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम हे सर्व्हेमध्ये पिछाडीवर असले तरी अमेरिकेतील लोकांना त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा वाढत आहे. Donald Trump may behind in poll survey but far ahead of Joe Biden in internet search

US Presidential Election | सर्व्हेमध्ये पिछाडीवर असणारे डोनाल्ड ट्रम्प 'या' गोष्टीत आघाडीवर
| Updated on: Nov 03, 2020 | 8:03 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान सुरु आहे. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यामध्ये ही लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व्हेमध्ये जो बायडन आघाडीवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर 8 अंकाची आघाडी मिळवली असल्याचा नामांकित पोलिंग संस्थांचा दावा आहे. मात्र,डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लोकांची उत्कंठा वाढत असल्याचे गुगल सर्च डाटा विश्लेषणातून समोर आले आहे. (Donald Trump may behind in poll survey but far ahead of Joe Biden in internet search)

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या एक दिवस अगोदर गुगलवर सर्चमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर दिसून आले तर बायडन पिछाडीवर होते. ट्रम्प यांच्याविषयी 45 टक्के तर बायडन यांच्याविषयी 23 टक्के लोक जाणून घेत होते.

गुगलवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी नेब्राका, वरमॉन्ट, एरिजोना, वॉशिंग्टन, ओरेगान सर्च झाले. यामधील काही राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन मिळते. डेलावेयर, टेक्सास, कोलंबिया, ओहायो, आर्कन्सा मध्येही गुगल सर्चमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते. या सर्व ठिकाणी बायडन पिछाडीवर राहिले.

लिल वेन आणि रॅपर्सशी भेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी लिल वेन आणि इतर रॅपर्सची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलन झाले होते, अशा वेळी रॅपर्सने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला. यामुळे लोक ट्रम्प यांच्याबद्दल सर्च करत असावेत, अशी शक्यता आहे.

पैन्सिलवैनियामधील सभा

पैन्सिलवैनियामधील डोनाल्ड ट्रम्प यांची सभा हे देखील त्यांना सर्च करण्याचं कारण असू शकते. या सभेत 60 हजारपेक्षा जास्त लोक हजर होते. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक सभेला जमा झाले होते. त्यामुळेही ट्रम्प यांना सर्च केले जात असावे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमणे धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला होता.

संबंधित बातम्या :

US Election 2020 live: डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन? काऊंटडाऊन सुरु; अमेरिकेत मतदानाला सुरुवात

बायडेन यांच्यासाठी ओबामांची ‘फोन पे चर्चा’, माजी राष्ट्राध्यक्षांनी आठ महिन्यांच्या बाळाची विचारपूस केल्यानं आईही भारावली

(Donald Trump may behind in poll survey but far ahead of Joe Biden in internet search)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.