US Election 2020 live: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचलं

राष्ट्राध्यक्ष आणि न्यू हॅम्पशायर राज्याच्या राज्यपाल पदासाठी काल रात्रीपासून मतदारांनी मतदानाला सुरवात केली. डिक्सविले नॉच येथील लेस ऑटन नावाच्या मतदाराने अमेरिकेत पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.

US Election 2020 live: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचलं
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 8:17 PM

[svt-event title=”इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचलं” date=”03/11/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेत सुरु असलेल्या मतदानावर प्रतिक्रिया देताना इरणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेची खिल्ली उडवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेत धांदल उडत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यात काही तथ्य नसल्याचं खोमेनी म्हणाले आहेत. तसेच, अमेरिकेत कुणीही निवडून आलं तरी इराणला काहीही फरक पडणार नसल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखीत केलं. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यापासून अमेरिका आणि इराणचे संबंध ताणलेले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन यांच्याकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन” date=”03/11/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

वॉशिंग्टन : [svt-event title=”निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत हिंसाचाराची शक्यता” date=”03/11/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, काही ठिकाणी हिंसाचार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुकानदार, व्यापारी आपल्या दुकानांची हानी होऊ नये म्हणून खबरदारी घेताना दिसत आहेत. महत्त्वाची ठिकाणं, शासकीय कार्यालयांची सुरक्षा वाढविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे निवास म्हणजेच व्हाईट हाऊसच्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात भिंत उभी करण्यात आली आहे. [/svt-event]

वॉशिंग्टन : अमेरिकेत आज होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. यावेळची निवडणूक विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trumph) आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) या दोघांमध्ये होत आहे. आज अमेरिकेत प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली असून न्यू हॅम्पशायर राज्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचं पहिलं मतदान झालं आहे. (Voting begins in United States Election 2020)

न्यू हॅम्पशायर येथील डिक्सविले नॉच आणि मिल्सफिल्ड या गावांत सर्वांत पहिल्यांदा मतदान झालं. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष आणि न्यू हॅम्पशायर राज्याच्या राज्यपाल पदासाठी काल रात्रीपासून मतदारांनी मतदानाला सुरुवात केली. डिक्सविले नॉच येथील लेस ऑटन नावाच्या मतदाराने अमेरिकेत पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.

[svt-event title=”कमला हॅरिस जिंकण्यासाठी तामिळनाडूत प्रार्थना” date=”03/11/2020,7:24PM” class=”svt-cd-green” ] भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या डेमोक्रॅटिक निवडणूक लढत आहेत. हॅरिस यांनी निवडणूक जिंकावी यासाठी तामिळनाडूतील तुलासेंतिरापूरम गावात प्रार्थना केली जात आहे. या गावात त्यांच्या नावाचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर?” date=”03/11/2020,6:52PM” class=”svt-cd-green” ] रिअल क्लिअर पॉलिटिक्सच्या सर्वेनुसार अमेरिकेतील प्रमुख राज्यांमध्ये जो बायडन ट्रम्प यांच्या तुलनेत 2.9 टक्के मतांनी पुढे राहतील, तर पूर्ण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प बायडेन यांच्या तुलनेत 6.5 टक्के मतांनी पिछाडीवर असतील [/svt-event]

आज 6 कोटी मतदार मतदान करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अमेरिकेत सर्व उपाययोजनांची अंमलबाजावणी करुन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत एकूण 10 कोटी मतदारांनी मंगळवारपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगण्यात येत आहे. तर, आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जवळपास 6 कोटी मतदार मतदान करतील, असा प्राथमिक अंदाज आहे. फ्लोरिड विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राधापक मायकल पी. मॅक्डोनाल्ड यांच्या म्हणण्यानुसार 1990 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. कोरोनाकाळात मतदार आपल्या घरातून बाहेर पडून उसत्स्फूर्तपणे मतदान करत असल्याची बाब उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मॅक्डोनाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणे, 2016 च्या तुलनेत या वर्षी जास्त प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे. टेक्सास, मोंटाना, हवाई अशा राज्यात 2016 च्या तुलनेत या वर्षीच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रम्प हे रिपब्लिक पक्षाकडून निवडणूक लढत असून बायडन डेमोक्रॅटिक पक्षाकडून मैदानात आहेत. अमेरिकन संसदेत एकूण 538 खासदार (इलेक्टोरल) असून राष्ट्राध्यक्ष पदासाठी 50 टक्के खासदार आपल्या पक्षाचे असणे बंधन ट्रम्प तसेच बायडन यांना बंधनकारक आहे. एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील महत्त्वाच्या राज्यात नागरिकांनी आधीच मतदान केलं असून या ठिकाणांहून डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन आघाडीवर आहेत. तर, आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ट्रम्प आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आज संपूर्ण अमेरिकेत मतदान होत असून नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला जात असल्याचं सागितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

स्वत:च्या फायद्यासाठी ट्रम्प यांच्याकडून पदाचा गैरवापर; त्यांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केलं : बराक ओबामा

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रेड स्टेट, पर्पल स्टेट, डेलीगेटस्, काँग्रेस नक्की काय आहेत या संज्ञा?

(Voting begins in United States Election 2020)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.