बायडेन यांच्यासाठी ओबामांची ‘फोन पे चर्चा’, माजी राष्ट्राध्यक्षांनी आठ महिन्यांच्या बाळाची विचारपूस केल्यानं आईही भारावली

बराक ओबामा नागरिकांना फोन बँकिंग उपक्रमाद्वारे फोन करुन जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत. बराक ओबामा यांनी असाच एक फोन अल्यास्सा या महिलेला फोन केला. Barack Obama was urging everyone to vote for Joe Biden through phone call

बायडेन यांच्यासाठी ओबामांची 'फोन पे चर्चा', माजी राष्ट्राध्यक्षांनी आठ महिन्यांच्या बाळाची विचारपूस केल्यानं आईही भारावली
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 12:39 PM

वॉशिंग्टन : माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचारासाठी नवा मार्ग स्वीकारला आहे. बराक ओबामा नागरिकांना फोन बँकिंग उपक्रमाद्वारे फोन करुन जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत. बराक ओबामा यांनी असाच एक फोन अल्यास्सा या महिलेला फोन केला आणि तिच्या सोबत तिच्या आठ महिन्यांच्या बाळासोबतही थोडासा संवाद साधला.माजी राष्ट्राध्यक्षांचा फोन आल्याने अल्यास्सा भारावून गेल्या.  (Barack Obama was urging everyone to vote for Joe Biden through phone call)

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अल्यास्सा हिला फोन करुन जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ओबामांनी अल्यास्सा यांच्या आठ महिन्यांच्या बाळाशी संवाद साधला. ”हे जॅक्स, व्हॉट्स गोईंग ऑन, मॅन” असं त्यांनी विचारलं आणि अल्यास्सा यांना मतदान करण्याचं आवाहन करुन संवाद संपवला. यावेळी त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांनाही मतदान करण्यास सांगावे, असं म्हटलं.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी प्रचार अभियान राबवले. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये लढत होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर प्रचारादरम्यान जोरदार टीकास्त्र सोडले.

कोरोना संकटात फोनद्वारे प्रचाराचा सुरक्षित मार्ग

बराक ओबामा त्यांचे जुने सहकारी जो बायडेन यांच्यासाठी प्रचार अभियान राबवत आहेत. ओबांमांनी प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्यावरुन जोरदार टीका केली. कोरोना संसर्गाच्या काळात ओबामांनी प्रचारासाठी सुरक्षित असा फोनद्वारे प्रचाराचा मार्ग स्वीकारला आहे. ते अमेरिकन नागरिकांना फोन करुन जो बायडेन यांच्यासाठी मत मागताना दिसत आहेत.

दरम्यान, अमेरिकेत प्रतिनिधी सभा (House of Representatives) आणि सिनेट मिळून काँग्रेस तयार होते. काँग्रेस अमेरिका सरकारची विधीमंडळ शाखा (legislative branch)आहे. प्रतिनिधी सभेमध्ये 438 आणि सिनेटमध्ये100 सदस्य असतात. एकूण 538 पैकी 270 मते मिळतील तो उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होतो.

संबंधित बातम्या :

US Presidential Election 2020: ट्रम्प निवडणूक हरणार की जिंकणार? आज फैसला

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

(Barack Obama was urging everyone to vote for Joe Biden through phone call)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.