US Presidential Election 2020: ट्रम्प निवडणूक हरणार की जिंकणार? आज फैसला

अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज (03 नोव्हेंबर) मतदान होणार असून हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे.

US Presidential Election 2020: ट्रम्प निवडणूक हरणार की जिंकणार? आज फैसला
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 10:55 AM

वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदासाठी (US Presidential Election 2020) आज (03 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असून अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार? याचा फैसला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जो बायडेन (Joe Biden) यांची बाजू अधिक भक्कम असून ही निवडणूक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हरू शकतात. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक हरले तर 1992 नंतर पहिल्यांदाच असं होईल की, विद्यमान राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत. (US Presidential Election 2020 : Donald Trump can lose election)

न्यूयॉर्क टाइम्स/सिएना कॉलेजच्या पोलनुसार पेन्सिल्वेनिया, फ्लोरिडा, एरोजोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सर्व राज्यांमध्ये 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. सीएनएन पोलनुसार एरिजोना, मिशिगन उत्तर कॅरोलिनामध्ये बायडेन जिंकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यातही 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प जिंकले होते.

एबीसी/वाशिंगटन पोस्टचा सर्वे बायडेन यांच्या चिंता वाढवणारा आहे. एबीसी/वाशिंगटन पोस्टच्या पोलनुसार बायडेन फ्लोरिडामध्ये 48 ते 50 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत. पेन्सिल्वेनियामध्ये बायडेन 44 ते 51 टक्के मतांनी आघाडीवर आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर 8 गुणांनी आघाडीवर आहेत. हिल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार, फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात संभाव्य मतदारांपैकी 52 टक्के लोकांनी माजी उपाध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर ट्रम्प यांना 44 टक्के पाठिंबा मिळाला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालापूर्वी विजयाची घोषणा करणार असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प मंगळवारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर विजयाची घोषणा करण्यासाठी नियोजन करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.ट्रम्प यांनी कॅरोलिनामधील शारलेटो विमानतळावर माध्यमांशी बोलताना विजयाच्या घोषणा करणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

स्वत:च्या फायद्यासाठी ट्रम्प यांच्याकडून पदाचा गैरवापर; त्यांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केलं : बराक ओबामा

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रेड स्टेट, पर्पल स्टेट, डेलीगेटस्, काँग्रेस नक्की काय आहेत या संज्ञा?

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

(US Presidential Election 2020 : Donald Trump can lose election)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.