Donald Trump | राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विजयाची घोषणा? डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा फेटाळल्या

डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर विजयाची घोषणा करण्यासाठी नियोजन करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. (Donald Trump denied news of winning announcement)

Donald Trump | राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विजयाची घोषणा? डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा फेटाळल्या
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 11:17 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालापूर्वी विजयाची घोषणा करणार असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प मंगळवारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर विजयाची घोषणा करण्यासाठी नियोजन करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.ट्रम्प यांनी कॅरोलिनामधील शारलेटो विमानतळावर माध्यमांशी बोलताना विजयाच्या घोषणा करणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं.निवडणुकीनंतर कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. (Donald Trump denied news of winning announcement)

निवडणुकीनंतर मतपत्र एकत्र करणे धोकादायक काम आहे. सुप्रीम कोर्टानं निवडणुकीनंतर मतपत्र एकत्रित करण्यासाठी ज्यादा कालावधी दिला असल्याच्या निर्णयावर ट्रम्पंनी टीका केली. मात्र, निवडणूक संपल्यानंतर कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

सुप्रीम कोर्टानं ज्यादा कालावधीसाठी मतपत्र जतन करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्ण्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतपत्रांचा दुरुपयोग होऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉम्प्युटरच्या आधुनिक काळात मतदानाच्या रात्री निकाल लागत नाही हे विचित्र असल्याचे म्हटले.

भारतीय मतदारांची निर्णायक भूमिका

अमेरिकेत 19 लाखांपेक्षा जास्त भारतीय मतदार आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या फ्लोरिडा, टेक्सास, जॉर्जिया, मिशिगन आणि पैन्सिलवेनिया मध्ये राहणाऱ्या 1 लाख 60 हजार भारतीय मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

UMass लोवेल सेंटर फॉर पब्लिक ओपिनियन या संस्थेने 28 ऑक्टोबरला टेक्सासमध्ये सर्वे घेतला. या सर्वेमध्ये 48 टक्के मतदारांचे डोनाल्ड ट्रम्पना समर्थन मिळाले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना 47 टक्के मतदारांचे समर्थन मिळाले.

सर्वेनुसार जो बायडेन आघाडीवर

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. हिल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार, शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात संभाव्य मतदारांपैकी 52 टक्के लोकांनी माजी उपाध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर ट्रम्प यांना 44 टक्के पाठिंबा मिळाला आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोन टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं समर्थन करतील. तर इतर 2 टक्के लोकांनी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणाव्यतिरिक्त, अन्य सर्वेक्षणांमध्येही बायडेन यांना अध्यक्षपदाची धुरा मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी हिल न्यूज वेबसाइटने जाहीर केलेल्या सीएनएन सर्वेक्षणात बायडेन यांना 54 टक्के मतदारांनी पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर 42 टक्के मतदारांनी अध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या : 

स्वत:च्या फायद्यासाठी ट्रम्प यांच्याकडून पदाचा गैरवापर; त्यांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केलं : बराक ओबामा

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

(Donald Trump denied news of winning announcement)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.