AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! ट्रम्प यांच्या निर्णयाने खळबळ, म्हणाले अमेरिकेत मृत्यूचा खेळ….

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला चकित करणारा निर्णय घेऊन टाकला आहे. त्यांनी कोलंबियाचे जहाज उडवून टाकल्यानंतर या नव्या निर्णयाची घोषणा केली आहे.

जग हादरलं! ट्रम्प यांच्या निर्णयाने खळबळ, म्हणाले अमेरिकेत मृत्यूचा खेळ....
donald trump
| Updated on: Oct 19, 2025 | 8:05 PM
Share

Donald Trump Ban On Colombia : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. अमेरिका फस्ट या धोरणाअंतर्गत त्यांनी जगाला थक्क करून टाकरणारे काही टोकाचे निर्णय घेतले आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी यूएस आर्मीने कॅरेबियन सागरातून ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेन सैन्याने हे जहाज थेट सागरात बुडवून टाकल्याचेही ट्रम्प सांगत आहेत. आता एकीकडे ट्रम्प यांनी हा दावा केलेला असताना दुसरीकडे त्यांनी कोलंबिया देशावर गंभीर स्वरुपाचे आरोप करत मोठा आणि धक्कादायक असा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले गंभीर आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांच्यावर काही आरोप केले आहेत. पेट्रो यांच्याकडून ड्रग्स निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप केला आहे. सोबतच हा आरोप करत त्यांनी आता कोलंबियाला अमेरिकेकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. ही घोषणा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर केली आहे. “कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो हे अवैध अमली गोळ्यांचे नेते आहेत. ते संपूर्ण कोलंबियात मोठ्या शहरांपासून ते छोट्या खेड्यापर्यंत अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. अमली गोळ्यांच्या उत्पादनासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. अमली गोळ्यांची निर्मिती हा कोलंबियातील सर्वात मोठा उद्योग झाला आहे,” असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेने केले कोलंबियाचे अनुदान बंद

सोबतच “गुस्तावो पेट्रो कोलंबियातील अमली गोळ्यांची निर्मिती थांबवण्यासाठी काहीही करत नाहीयेत. हे सगळं थांबवण्यासाठी त्यांना अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. मात्र ते अमली गोळ्यांची निर्मिती रोखण्यासाठी काहीही करत नसल्यामुळे आजपासून त्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही. अमली पदार्थांचे उत्पादन करून ते अमेरिकेत विकणे हाच कोलंबियाचा उद्देश आहे,” असेही मत ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

अन्यथा अमेरिकेचा दरवाजा बंद करू

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी गुस्तावो पेट्रो यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. गुस्तावो पेट्रो यांनी मृत्यूचा खेळ खेळणे बंद करावे अन्यथा आम्ही त्यांच्यासाठी अमेरिकेचा दरवाजा बंद करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांनी कोलंबियाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?