No Kings Protest : मोठी बातमी! आता अमेरिकेत सत्तापालट? लाखो लोक ट्रम्प यांच्याविरोधात एकवटले; नो किंग्स आंदोलन पेटले
सध्या अमेरिकेत वातावरण चांगलेच तापले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. तिथे सध्या नो किंग्स आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आगामी काळात इथे नेमके काय होणार? असे विचारले जात आहे.

Protest Against Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नेहमीच जगात चर्चा असते. त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचा अनेक देशांवर परिमाम पडतो. इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजापली. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत. त्यांची जगभरात चर्चा असली तरी अमेरिकेत मात्र त्यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा कडाडून विरोध केला जात असून तिथे ‘नो किंग्ज’ हे आंदोलन चांगलेच फोफावले आहे.
नेमके आंदोलन का सुरू झाले?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत सध्या अनेक ठिकाणी नो किंग्स हे आंदोलन केले जात आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सध्या वॉशिग्टन डीसीपासून ते लंडनपर्यंत हजारो लोक एकत्र जमले असून ट्रम्प यांच्याविरोधात हे आंदोलन केले जात आहे. ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण, शिक्षण आणि सुरक्षाविषयक धोरणाचाही विरोध केला जात आहे. या आंदोलनाच्या आयोजकांनी केलेल्या दाव्यानुसार अमेरिकेसोबतच जगभरात एकूण 2600 ठिकामी ड्रम्प यांच्याविरोधात नो किंग्ज आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्या हुकूमशाही धोरणाचा विरोध केला जातोय, असे या आंदोलनाच्या आयोजकांचे मत आहे.
ट्रम्प यांना विरोध का होत आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळाल्यानंतर अवघ्या दहाच महिन्यात ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण कठोर केले आहे. पॅलेस्टाईन समर्थकांचे आदोलन , विविधता नीति धोरणाअंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी कमी करण्यात आला आहे. अमेरिकेतील राज्यांत नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या याच धोरणांचा विरोध केला जातोय. ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे सामाजिक विभाजनाची दरी आणखी खोल होत आहे. लोकशाही मूल्ये धोक्यात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर राबवली जात आहे मोहीम
दरम्यान सध्या ट्रम्प यांच्याविरोधात नो किंग्ज धोरण राबवले जात असले तरी खुद्द ट्रम्प यांनी मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावरदेखील या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोहीम राबवली जात आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहराच्या आसपासदेखील आंदोलन झालेले आहे. दरम्यान, आता नेमके काय होणार? ट्रम्प या आंदोलनाची कशी दखल घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
