AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील दोन दिवसात… इराण-अमेरिका शांतता चर्चेबाबत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून खास संकेत

Donald Trump : काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात चर्चा झाली होती, मात्र त्यात कोणताही करार झाला नव्हता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दुसऱ्या टप्प्यातील चर्चेचे संकेत दिले आहेत.

पुढील दोन दिवसात... इराण-अमेरिका शांतता चर्चेबाबत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून खास संकेत
trump djImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 14, 2026 | 10:42 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्या जरी युद्ध विराम झाला असला तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात चर्चा झाली होती, मात्र त्यात कोणताही करार झाला नव्हता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दुसऱ्या टप्प्यातील चर्चेचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अमेरिका आणि इराणचे अधिकारी पुढील दोन दिवसांत इस्लामाबादमध्ये पुन्हा भेटू शकतात. त्यांनी सांगितले की, 11 एप्रिलला पहिली बैठक इथेच झाली होती आणि पुन्हा तिथेच चर्चा होऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचेही कौतुक केले आणि ते उत्कृष्ट काम करत असल्याचे म्हटले. यामुळेच दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेची शक्यता वाढल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावरून पाकिस्तान या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या वक्तव्यात काहीसा गोंधळही दिसून आला. कारण त्यांनी याआधीच म्हटले होते की, चर्चा धीम्या गतीने सुरू आहे आणि पुढील बैठक कदाचित पाकिस्तानमध्ये होणार नाही. तसेच त्यांनी असेही म्हटले होते की पुढील बैठक युरोपसारख्या दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते. मात्र आता त्यांनी पुन्हा पाकिस्तानात चर्चा होणार असल्याचे विधान केले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील चर्चेची वेळ आणि ठिकाण निश्चित नाही

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानातून हे स्पष्ट होते की, अमेरिका आणि इराणमधील चर्चा पूर्णपणे थांबलेली नाही. दोन्ही बाजू अजूनही चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दुसऱ्या टप्प्यातील चर्चेसाठी वेळ आणि ठिकाणाबाबत अद्याप ठरलेले नाही. दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींनी इस्लामाबादमध्ये भेट घेतली होती, परंतु ही बैठक निष्फळ ठरली. दोन्ही बाजूंनी चर्चेच्या अपयशासाठी एकमेकांना जबाबदार धरले होते.

होर्मुजमधून कोणतेही जहाज पुढे गेलेले नाही

अमेरिकेने म्हटले की, इराणच्या बंदरांवर आणि किनारपट्टीवर लावलेल्या नाकेबंदीच्या पहिल्या 24 तासांत एकही जहाज पुढे जाऊ शकलेले नाही. या नाकेबंदीसाठी 10,000 हून अधिक सैनिक, अनेक युद्धनौका आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत. 6 व्यापारी जहाजांनी अमेरिकन सैन्याच्या सूचनांचे पालन करून आपला मार्ग बदलला आणि परत इराणी बंदरांकडे वळले. मात्र काही अहवालांनुसार इराणशी संबंधित 4 जहाजे होर्मुज सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी ठरल्याचेही समोर आले आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?