AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साधा गणवेश, अनोळखी चेहरा… गर्दीचा भाग होतात सीक्रेट गार्ड; ट्रम्प यांना वाचवण्यासाठी धावले तेव्हा कळलं… कसे असतात सीक्रेट गार्ड?

वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या (WHCA) बैठकीदरम्यान गोळीबार झाला. ट्रम्प तिकडेच जेवण करणार होते. पण गोळ्यांचा आवज ऐकू येताच सिक्रेट सर्व्हिस आणि स्पेशल फोर्सेसने तात्काळ त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं... सिक्रेट सर्व्हिस कायम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मोठया नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते...

साधा गणवेश, अनोळखी चेहरा... गर्दीचा भाग होतात सीक्रेट गार्ड; ट्रम्प यांना वाचवण्यासाठी धावले तेव्हा कळलं... कसे असतात सीक्रेट गार्ड?
| Updated on: Apr 26, 2026 | 12:20 PM
Share

वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या (WHCA) बैठकीदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे… ज्या क्षणी फायरिंग झाली, त्याच क्षणी सुरक्षा एजेन्सी यूनायटेड स्टेट सीक्रेट सर्व्हिसने तात्काळ कारवाई केली, ज्यामुळे मोठी घटना टळली आहे… यावेळी ट्रम्प यांनी सुरक्षारक्षकांचं कौतुक देखील केलं… ट्रप्म म्हणाले, ‘सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे. पण बुलेटफ्रुफ सुरक्षा असल्यामुळे त्याला काहीही झालं नाही. तर, हल्लेखोरांना देखील तात्काळ पकडण्यात आलं… ‘

ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी, अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिसवर आहे… ट्रम्प यांचं संरक्षण करणारी सिक्रेट सर्व्हिसची टीम ‘हाय-टेक हेल्मेट’ म्हणून ओळखले जाणारे हेल्मेट वापरते. या प्रकारच्या हेल्मेटला ‘हाय-कट’ किंवा ‘फास्ट’ हेल्मेट म्हटलं जातं. हे हेल्मेट केवळ संरक्षणासाठीच नव्हे, तर एका फिरत्या कंट्रोल रूम प्रमाणेही काम करतात..

स्पेशस हेल्मेटवर कॅमेरे लावलेले असतात. ज्यामुळे संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद होते. एवढंच नाही तर, गरज भासल्यास, बॅकअप फोर्स देखील पाठवण्यात येतं… डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्यक्रम, रॅली इत्यादी कार्यक्रमांमध्ये सिक्रेट सर्व्हिस अर्लट मोडवर काम करत असते…

यूनायटेड स्टेट सीक्रेट सर्व्हिस काय आहे?

युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस ही एक सरकारी संस्था आहे. तिची भूमिका केवळ राष्ट्राध्यक्षांचं संरक्षण करणं एवढीच नाही, तर देशाची आर्थिक आणि सायबर सुरक्षा मजबूत करणं ही देखील आहे. ही संस्था दोन प्रमुख कार्ये पार पाडते: देशाच्या सर्वोच्च नेत्यांचे संरक्षण करणं आणि आर्थिक व गुन्हेगारी कारवायांचा तपास करणं.

सिक्रेट सर्व्हिसचे दोन सर्वात महत्त्वाचे काम…

सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे, अमेरिकेतील मोठ्या नेत्यांची सुरक्षा करणे. यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, भावी राष्ट्रपती, त्यांचे कुटुंबीय, माजी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच भेट देणारे परदेशी नेते यांचा समावेश आहे. हे व्हाइट हाऊस, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान आणि अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारतींचेही संरक्षण करतात. सिक्रेट सर्व्हिस फक्त बॉडीगार्ड प्रमाणे काम करत नाही तर, आधीच येणारं संकट ओळखण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये असते… त्यामुळे ही एजेन्सी आधी सर्व ठिकाणची चौकशी करते… एवढंच नाही तर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करते आणि गुपित माहिती शोधून काढते.

सिक्रेट सर्व्हिसचं दुसरं सर्वात मोठं काम म्हणजे, आर्थिक आणि सायबर अपराधांची तपासणी करणं.. यामध्ये नकली नोट, बँकेची फसवणूक, क्रेडिट कार्ड फ्रॉड, ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग आणि सायबर अटॅक देखील सामिर आहे.. सिक्रेट सर्व्हिसची सुरुवात 1865 रोजी झाली. जेव्हा अमेरिकेत नकली नोटांची समस्या मोठ्या प्रमाणात होती.

सिक्रेट सर्व्हिस कसं करते काम

या एजन्सीचे एजंट अत्यंत विशेष प्रशिक्षण घेतात. त्यांना धोका ओळखणे, जमावापासून संरक्षण, शस्त्रांचा वापर आणि सायबर गुन्हे शोधणे यामध्ये प्रशिक्षित केलं जातं. हे एजंट ओळखले जाऊ नये म्हणून अनेकदा सामान्य कपडे घालतात. तुम्ही त्यांना सिनेमांमध्ये कानात छोटे इअरपीस घातलेले पाहिले असेल.

त्याना कोणते मिळतात विशेष अधिकार

सिक्रेट सर्व्हिस इतर अनेक विशेष कार्ये देखील पार पाडतात, यामध्ये मोठ्या कार्यक्रमांना सुरक्षा देणं, परदेशातील नेत्यांचे संरक्षण करणं आणि सायबर गुन्हेगारी कृती दल चालवणंही. संस्था बाल शोषण आणि हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचाही तपास करते. शिवाय जगभरातील सायबर गुन्हेगारांना पकडण्यास मदत करते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल